मुंबई: Robot Gollar वरळीच्या पोद्दार हॉस्पिटलमध्ये कोरोना रूग्नांना जेवण, औषधं देण्यासाठी दाखल (Watch Video)
Robot Gollar । Photo Credits: Twitter/ CMO Maharashtra

मुंबई मध्ये मागील तीन महिन्यांपेक्षा अधिक दिवसांपासून 'वॉर अगेन्स्ट व्हायरस' सुरू आहे. दरम्यान आता मुंबई महानगर पालिका क्षेत्रामध्ये कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश मिळताना दिसत आहे. पण आता लढाईमधील कोविड योद्धे सुरक्षित ठेवण्यासाठी गोलर (Gollar) हा रोबोट दाखल झाला आहे. वरळीच्या पोद्दार हॉस्पिटलमध्ये (Podar Hospital) रूग्णांना अन्न आणि औषधं देण्यासाठी हा गोलर रोबोट काम करणार आहे. नुकतीच त्याची सेवा सुरू झाली आहे.

मुख्य्मंत्री कार्यलयाकडून काल रोबोट गोलर च्या सेवेचा पहिला व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. यामध्ये 'आपला रोबोट ‘गोलर’ मुंबईच्या पोद्दार रुग्णालयात ड्युटीवर दाखल झाला आहे. अन्न,पाणी व औषधे रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचे काम 'गोलर' करत आहे. WarAgainstVirus मधील हे महत्त्वाचे पाऊल आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींसोबत संपर्क कमी होणार असल्याने जोखीम कमी होणार आहे.' असं कॅप्शन देत हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. दरम्यान या रोबोटमुळे कर्मचार्‍यांना पीपीई कीट घालून करावी लागणारी रूग्णसेवा, त्यावरचा ताण कमी होणार आहे. हा रोबोट गोलर स्थानिक कोविड फ्रंटलाईन वर्कर्सनी बनवला असल्याची माहिती वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच दिली आहे.

मुख्यमंत्री कार्यालय ट्वीट

वरळी हा एकेकाळी मुंबई शहरामधील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा वॉर्ड होता. मात्र आता त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. दरम्यान काल मुंबईमध्ये 806 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 86,132 वर पोहोचली आहे. मात्र अ‍ॅक्टिव्ह रूग्ण 22,996 आहेत.