नागपूर मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 7 मार्च पर्यंत घालण्यात आलेले निर्बंध पुढील आदेशापर्यंत 14 मार्चपर्यंत कायम
Lockdown | File Image | (Photo Credits: PTI)

नागपूरात (Nagpur) कोरोनाचा (Coronavirus) वाढता फैलाव लक्षात घेता नागपूरात 25 फेब्रुवारीपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. 7 मार्चपर्यंत लागू करण्यात आलेले हे निर्बंध पुढील आदेशापर्यंत 14 मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागपूरकरांनी या गोष्टीची दखल घेत या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेले कडक निर्बंध 14 मार्चपर्यंत वाढविण्यात आले आहे. या दरम्यान मंगल कार्यालय, लॉन, सेलिब्रेशन हॉलमधील विवाह बंद राहतील. सर्व राजकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना बंदी कायम राहील. शाळा, महाविद्यालय, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था बंद राहतील.

अत्यावश्यक सेवा वगळता नागपूरात अन्य गोष्टी बंद राहणार आहेत. या कडक निर्बंधानुसार, आठवड्याचा बाजार 14 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. 14 मार्चपर्यंत सर्व शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस बंद राहतील. हॉटेल, रेस्टोरेंट 50 टक्के क्षमतेने चालतील, रात्री 9 नंतर हॉटेल बंद केले जातील. सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम 14 मार्च पर्यंत बंद राहतील. मंगल कार्यालय 14 मार्चपर्यंत बंद राहणार. त्यामुळे 50 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत घरी लग्न करता येईल. मंगल कार्यालयमध्ये 14 मार्चपर्यंत लग्न होणार नाही. बंद करण्यात आलेले कोविड सेंटर सुरू करणार, आरोग्य पथकाच्या गृहभेटी संख्या वाढवणार. नवीन हॉटस्पॉट शोधून कंटेंमेंट झोन निश्चित केले जाणार आहेत. हेदेखील वाचा- नागपूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नियमावली कडक; शाळा, कॉलेज ते लग्नाचे हॉल बंद करण्याबाबत नितीन राऊत यांनी दिले हे आदेश

काय सुरु राहणार?

  • वैद्यकीय सेवा
  • वृत्तपत्र, मीडिया संदर्भातील सेवा
  • दूध विक्री आणि पुरवठा
  • फळे विक्री आणि पुरवठा
  • गॅरेज, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा
  • बांधकामे, उद्योग आणि कारखाने
  • किराणा दुकाने, चिकन, मटन, अंडी आणि मांस विक्री दुकाने
  • पशु खाद्य दुकाने
  • बँक आणि पोस्ट सेवा संदर्भात त्यांचे नियमानुसार सेवा सुरु ठेवण्यास मुभा राहील

नागपूरात काल (5 मार्च) रोजी 1393 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. तर 583 रुग्ण कोरोना मुक्त झाले. तर दुसरीकडे कोरोनामुळे 9 रुग्णांचा मृत्यू झाला.