महाराष्ट्र राज्यात 'या' विविध समाजांना किती टक्के आरक्षण मिळणार, जाणून घ्या
Reservation | (Photo credit: archived, edited, symbolic images)

आज (27 जून) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मराठा आरक्षणाबद्दल (Maratha Reservation)अंतिम निर्णयाची घोषणा केली आहे. यामध्ये मराठा समाजासाठी यापूर्वी 16 टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली होती. मात्र लागू केलेले आरक्षण हे 12-13 टक्के असल्याचे घोषित करण्यात आले आहे. तर मुंबई उच्च न्यायालयात आरक्षाच्या समर्थनात 2 आणि विरोधात 4 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. तर राज्य सरकारने आता शिक्षणासाठी 12 टक्के आणि नोकरीसाठी 13 टक्के आरक्षण लागू होणार असल्याचे म्हटले आहे.

रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी आज यावर निर्णय दिला आहे. राज्य सरकारला आरक्षण देण्यास अधिकार आहे. 102 व्या घटनादुरूस्तीनुसार राज्य सरकार आरक्षण देऊ शकतं. मराठा समाज मागास असल्याचं सांगितलं आहे. न्यायालयाने आरक्षण वैध ठेवले आहे. या आरक्षणासाठी मंजूरी मिळाल्यानंतर कोर्टाच्या परिसरासह राज्यात मराठा समाजाने आंनद व्यक्त केला आहे.

(Maratha Reservation Verdict: मराठा आरक्षण वैध पण 16% नाही, शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळणार; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय)

'या' विविध समाजांना किती टक्के आरक्षण मिळणार पुढीलप्रमाणे:

- मराठा समाज- 12-13 टक्के

-इतर मागासवर्ग- 19 टक्के

-अनुसूचित जाती- 13 टक्के

-अनुसूचित जमाती-7 टक्के

-विमुक्ती जाती- 3 टक्के

-विशेष मागासवर्ग- 2 टक्के

-भटकी जमात (बी)- 2.5 टक्के

- भटकी जमात (सी) (धनगर)- 3.5 टक्के

-भटकी जमात (डी) (वंजारी)- 2.5 टक्के

मराठा समाजाने मागील 3 वर्षामध्ये सुमारे 48 मोर्चे काढून या आरक्षणासाठी मागणी तीव्र केली होती. महाराष्ट्रात डिसेंबर 2018 मध्ये सरकारने 16% आरक्षण जाहीर केले होते. त्यानुसार नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाच्या लोकांना आरक्षण देण्यात आले होते.