Raju Vitkar On Shiv Sena: एकनाथ शिंदे यांना धक्का, राजू विटकर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परतले
(Photo Credit - File Image)

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून अनेक शिवसेना (Shiv Sena Party) पदाधिकारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात जात आहेत. दुसऱ्या बाजूला आपली वाट चुलल्याचे लक्षात येताच पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना साद घालत मूळ शिवसेना पक्षात परतणाऱ्यांची संख्याही हळूहळू वाढते आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले राजू विटकर (Raju Vitkar) हेसुद्धा पुन्हा असेच शिवसेनेत परतले आहेत. शिवसेनेत परतलेल्या विटकर यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा पक्षात बोलवा अशी आर्त हाकही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घातली आहे. बंडखोर शिवसेना आमदारांनीही पुन्हा पक्षात यावे असे अवाहनही राजू विटकर यांनी केले आहे. हे अवाहन करताना प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर विटकर यांचे डोळे भरुन आले.

राज विटकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मी शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जायला नको होते. मी मूळ पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची साद सोडण्याची आवश्यकता नव्हती. घडल्या गोष्टीचा मला पश्चाताप होतो आहे. मी जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करुन घरी आलो तेव्हा माझ्या कुटुंबीयांनाही माझा निर्णय आवडला नव्हता. माझ्याच घरातील लोकांनी मला सांगितले की आपण योग्य निर्णय घेतला नाही. शिवसेना सोडायला नको होते. शिवसेना पक्षाने आपल्याला काहीही कमी केले नाही. जर पक्षाने आपल्याला काहीच कमी केले नाही तर मग आपण हा निर्णय का घ्यायचा? घरातूनच असे म्हटल्यानंतर मलाही माझ्या निर्णयाचा पश्चाताप झाला, असे विटकर म्हणाले. (हेही वाचा, Sanjay Raut on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्या 'लाऊडस्पीकर' टीकेला संजय राऊत यांचे प्रत्युत्तर 'तुमच्या पिपाण्या लोकांनीच बंद केल्या')

राजू विटकर पत्र (व्हायरल)

Raju Vitkar Letter

 

दरम्यान, शिवसेना पक्षाची झालेली अवस्था मला पाहावली नाही. मी पुण्यात काम करतो. परंतू, आदित्य ठाकरे यांनी नाशिक काढलेला दौरा आणि त्या दौऱ्यात त्यांनी काढलेले उद्गार मनाला हेलावून गेले. लोक त्यांना प्रतिसाद देत होते. जुणे जाणते शिवसैनिक डोळ्यात पाणी आणून रडत होते. मी पक्षासाठी पाठिमागील अनेक वर्षे काम करतो आहे. पक्षाची झालेली ही आवस्था मला पाहावली नाही. हे सगळे सहन न झाल्याने मी परत पक्षात आलो. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांच्या माध्यमातून आपण शिवसेना प्रवेश केल्याचे राजू विटकर म्हणाले.