Cyclone Biparjoy: ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या तयारीसाठी रायगड जिल्हा प्रशासनानेकडून मार्गदर्शक तत्वे आणि हेल्पलाइन क्रमांक जारी

शिवाय, सध्या समुद्रात असलेल्या मच्छिमारांना किना-यावर परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Cyclone प्रतिकात्मक प्रतिमा | (Photo Credits: Twitter/ANI)

Cyclone Biparjoy: अरबी समुद्रात येणाऱ्या ‘बिपरजॉय’ (Biparjoy) नावाच्या चक्रीवादळाच्या तयारीसाठी रायगड जिल्हा प्रशासनाने (Raigad District Administration) सल्लागार आणि हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. मुंबईतील प्रादेशिक हवामान खात्याने इशारा दिला आहे की, चक्रीवादळ पुढील 36 तासांत तीव्र होणार असून, पुढील दोन दिवसांत ते उत्तर-पश्चिम दिशेने सरकणार आहे.

जिल्हा प्रशासनाने मच्छिमारांना 9 ते 12 जून या कालावधीत समुद्रात मासेमारी करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय, सध्या समुद्रात असलेल्या मच्छिमारांना किना-यावर परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कालावधीत किनारपट्टीच्या प्रदेशात उग्र समुद्र आणि वेगाने वारे वाहतील. त्यामुळे नागरिक आणि पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. (हेही वाचा -Cyclone Biparjoy Update: येत्या 24 तासांत ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ वेग पकडणार; कुठे होणार परिणाम? जाणून घ्या)

हेल्पलाइन क्रमांक -

1. जिल्हा नियंत्रण कक्ष-02141-222097

2. जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष-02141-228473 टोल फ्री क्रमांक 112

3. प्रादेशिक बंदरे विभाग नियंत्रण कक्ष-02141-222746

4. पनवेल-022-27452399, तहसीलदार, श्री.विजय तळेकर, (9420919992)

5. उरण-022-27222352, तहसीलदार, श्री. उद्धव कदम, (8108504037)

6. कर्जत- 02148-222037, तहसीलदार श्री. शितल रसाळ, (8087513083)

7. खालापूर-02192-275048, तहसीलदार श्री. आयुब तांबोळी, (9975751076)

दरम्यान, 9 जून रोजी जिल्ह्याच्या काही भागात ताशी 30-40 किमी वेगाने वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय, हवामान संस्थेने सांगितले की, जिल्ह्यात 11 जून रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि दुसऱ्या दिवशी जिल्ह्याच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.