Rules For Wedding In Pune: पुण्यात आता लग्नाचे नियम कठोर; 50 जणांंची मर्यादा ते लग्नाचा व्हिडिओ पोलिसांंकडे शेअर करण्यापर्यंत 'हे' आहेत रुल्स
Image For Representation (Photo Credits: Pixabay)

Rules For Wedding In Pune: पुण्यात (Pune)  जिल्हा प्रशासनाने शहरी आणि ग्रामीण भागात लग्न समारंभांसाठी काही नवे नियम जाहीर केले आहेत. महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी मिशन बिगेन अगेन (Mission Begin Again) चा भाग म्हणून जाहीर केलेल्या सूचनांच्या आधारे पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी नवे निर्देश जाहीर केले आहेत. यामध्ये सोशल डिस्टंंसिंगच्या (Social Distancing) नियमांंपासुन ते उपस्थितांंच्या मर्यादेपर्यंंत सर्व नियम कठोरपणे लागु केले जाणार आहेत. तसेच लग्नानंंतर पाच दिवसांंच्या आत पोलिसांंकडे लग्नाचा व्हिडिओ (Wedding Video)  जमा करायचा आहे असेही सुचित करण्यात आले आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात माहिती दिली आहे. जर का यापैकी कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले तर लग्नाचे ठिकाण (लॉन किंंवा हॉल) तात्काळ बंंद करण्यात येईल असेही सांंगितलेले आहे. पुणे: कोरोना संकट नियंंत्रणात आणण्यासाठी अजित पवार यांंनी प्रकाश जावडेकर यांंच्यामार्फत केंद्राकडे केल्या 'या' मागण्या

नव्या नियमावली नुसार, लग्नाला जास्तीत जास्त 50 लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे, ज्यामध्ये वेटर, भटजी, बॅण्ड वाले, कॅटरस, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यांंचा सुद्धा समावेश असेल. लग्नाच्या वेळी उपस्थितांंनी एकमेकांंत 6 फुट अंतर राखणे गरजेचे आहे. या सर्व उपस्थितांंची यादी पोलिस स्टेशन मध्ये लग्नाआधी जमा करायची आहे.सर्वांना मास्कचा वापर करणे अनिवार्य असणार आहे. कार्यक्रमस्थळी दारु, गुटखा, पान मसाला खाण्यास व थुंंकण्यास परवानगी नसेल.

कार्यक्रमस्थळ कसे असावे यासंदर्भात सुद्धा सुचना करण्यात आल्या आहेत, ज्यानुसार, वातानुकुलीत हॉल वापरण्यास परवानगी नसेल. तसेच कार्यक्रमाच्या पुर्वी खुर्च्या, टेबल, किचन, जेवणाची जागा, वॉशरुम्स हे निर्जंतुक केलेले असावे.असे सांंगण्यात आले आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005  च्या नव्या आदेशानव्ये लागु केलेल्या या नियमांंची अमंलबजावणी होत आहे का हे पाहण्यासाठी पोलीस पाटील, ग्राम सेवक, तलाठी आणि भरारी पथकं नेमून दिली आहेत. कुठेही नियमांंचे उल्लंघन झाल्यास ही भरारी पथके त्याविषयी थेट पोलिसांंना माहिती देतील व त्यानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा नागरिकांंना देण्यात आला आहे.