Pune Weather Prediction, July 31: पुण्यात आज यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात आज ढगाळ वातावरण सोबतच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी दिवसभरात पुण्यात 4.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुणे शहरात जरी माध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज असला तरी घाटमाथ्यावर मात्र  मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणेस, कोकण, सातारा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ यासाह काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे सोबतच या सर्व जिल्हयान यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहरात हा यल्लो अलर्ट  उद्या पर्यन्त जारी राहील. भारतीय हवामान खात्याने (IMD) 30 जुलैपर्यंत पुणे शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ढगाळ आकाश आणि 3 ऑगस्टपर्यंत घाट परिसरात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.आता पुण्यात उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने पुण्यातत उद्याचे हवामान याचा अंदाज लावला आहे. हेही वाचा: Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

पुण्यात उद्याचे हवामान कसे?

हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे