Pune Rain: पुणे, बारामती मध्ये पावसाचा हाहाकार; नागरिकांनी शेअर केले पावसाच्या रौद्ररूपाचे व्हिडिओज आणि फोटोज
यातील काही लोकांनी पावसाचे हे रौद्र रुपाचे व्हिडिओज शेअर केले आहेत.
मागील दोन दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून बसलेल्या पावसाने बुधवारी रात्री (25 सप्टेंबर) रौद्र रुप धारण केले. या पावसाने सर्व पुणेकर भयभीत झाले असून सळो की पळो अशी त्यांची अवस्था झालेली पाहायला मिळत आहे. कोसळधार पावसामुळे पुण्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून सर्व सखल भागात पाणीच पाणी साचलेले चित्र पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केले आहे. सोशल मिडियावर या पावसाचे अपडेट्स बुधवारी रात्रीपासूनच यायला सुरुवात झाली असून यात काही चित्तथरारक असे व्हिडिओज पाहायला मिळत आहे.
मुसळधार पावसामुळे काही लोकांनी घरात राहणे पसंत केले. यातील काही लोकांनी पावसाचे हे रौद्र रुपाचे व्हिडिओज शेअर केले आहेत.
पाहा व्हिडिओ:
View this post on Instagram
#punerains #waraje, #sakalmediagroup #sakalmedia
A post shared by DS_Sawant (@datta.sawant1010) on
A post shared by Pune Mirror (@thepunemirror) on
View this post on Instagram
Warje, pune #punerains #pune #rains #takecareofyourself
A post shared by itspunebro (@itspunebro) on
हेही वाचा- Pune Rains: पुणे, बारामती शहरामध्ये पावसाचा कहर; शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर
पुण्यातील पावसाने काही भागात दरड कोसळली तर आहे तर काही भागात कमरेपर्यंत पाणी साचले आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला असून लांब पल्ल्याच्या गाड्यांवर झाला आहे.
त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पुणे महापालिकेकडून करण्यात येत आहे.