पुणे: प्रियंका शेटे च्या कुटूंबातील  3 जणांविरोधात तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनमध्ये FIR दाखल; आंतरजातीय प्रेमप्रकरणाला विरोध केल्याने मुलीने कुटूंबीयांना खेचले कोर्टात
Priyanka Shete (Photo Credits: Twitter/ANI)

आंतरजातीय प्रेमप्रकरणाला आणि विवाहाला कुटूंबाने विरोध केल्याने कोर्टाची पायरी चढलेली प्रियंका शेटे (Priyanka Shete) आणि तिच्या बॉयफ्रेंडला कोर्टाला संरक्षण दिले आहे. आज पुण्याच्या तळेगाव दाभाडे येथे  पोलिस स्टेशनमध्ये  प्रियंका शेटे हीच्या घरातील 3 कुटूंबीयांविरोधात IPC 344,352,323,506,507 अंतर्गत एफआरआय दाखल करण्यात आली आहे.  प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी आई-वडिलांच्या विरोधात पोटची मुलगी न्यायालयात!

ANI ट्विट

प्रियंका शेटेने 7 मे दिवशी मुंबई उच्च न्यायालयात यचिका दाखल केली आहे. कुटुंबीयांकडून प्रियंका आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या जीवाला धोका असल्याचं तिने सांगितलं आहे. 19 वर्षीय प्रियांकाच्या प्रियकराबाबत घरी समजताच तिच्या पालकांनी तिला रोखायला व मारहाण करायला सुरवात केली.या विरोधात न्यायालयात तक्रार करत प्रियंकाने संविधानातील कलम 21 अंतर्गत आपले पालक वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणत आहेत असे म्हणत जीवाच्या सुरक्षेची मागणी केली होती.