Pune: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बॅडमिंटन प्रशिक्षकाला अटक; पुण्याच्या हिंजवडी परिसरातील घटना
Representational Image | (Photo Credits: PTI)

राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. यातच पुण्यातील (Pune) हिंजवडी (Hinjawadi) परिसरात बॅडमिंटन प्रशिक्षकाने (Badminton Coach) अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Minor Girl) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बॅडमिंटन प्रशिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली असून याप्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

राकेश यशवंत दलाल (वय, 36) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, पीडिता गेल्या पाच वर्षांपासून आरोपीकडून बॅडमिंटनचे शिक्षण घेत आहे. दरम्यान, आरोपीने शनिवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास पीडिताला शटल बॉक्स जिम लॉकरमध्ये ठेवण्यास सांगितला. त्यानंतर आरोपीही तिच्या पाठोपाठ गेला आणि तिच्या खेळण्याचे कौतूक करू लागला. तसेच तू चांगली खेळाडू असल्याचे सांगत त्याने शेकहॅन्डसाठी हात पुढे केला. मात्र, पीडिताने हात पुढे करताच आरोपीने तिला मिठीत घेतले. हे देखील वाचा- Mumbai Rape Case: राजकोटमधील पुजाऱ्याचा मुंबईतील महिलेवर वारंवार बलात्कार, तिघांना अटक

त्यानंतर पीडित मुलीने घरी गेल्यानंतर तिच्यासोबत घडलेला सर्वप्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर पीडिताच्या आईने ताबडतोब तिला घेऊन हिंजवडी पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत, अशी माहिती लोकसत्ताने आपल्या वृत्तात दिली आहे.