Journalist Pandurang Raykar Dies of Corona: पुणे येथील कोरोना बाधित पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू; सरकारी कोविड सेंटरमध्ये उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप
Pune Journalist Pandurang Raykar's Sister (Photo Credits: ANI)

पुणे (Pune) येथील एका कोरोना बाधित पत्रकाराचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. पांडुरंग रायकर (Pandurang Raykar) असे या मृत पत्रकाराचे नाव आहे. पांडुरंग रायकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना पुण्यातील सरकारी कोविड सेंटरमध्ये (Govt COVID Centre) दाखल करण्यात आले होते. मात्र योग्य पद्धतीने उपचार न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांचे कुटुंबिय करत आहेत.

"सरकारी कोविड सेंटरमध्ये प्रचंड गोंधळ आहे. डॉक्टरांना पुरेसे ट्रेनिंग देण्यात आलेले नाही. त्यामुळे पांडुरंग यांच्यासाठी cardiac ambulance व्यवस्था करणे त्यांना जमले नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला," असे पांडुरंग यांच्या बहिणीचे म्हणणे आहे.

ANI Tweet:

या घटनेवर प्रतिक्रीया देताना भाजप नेते किरीट सौमय्या यांनी ठाकरे सरकारवर आरोप केले आहेत. "तरुण पत्रकार  पांडुरंग रायकर यांच्या निधनाच्या वृत्ताने दुःख झाले. ठाकरे सरकार सर्व स्टॅंट्स बंद करुन कोविड विरुद्ध काम करणार आहे का? अम्बुलन्स नाही, हॉस्पिटल नाही. Remdesivir आणि Tosilizumab औषधांचा तुटवडा, हॉस्पिटलचे अवाजवी बिल्स आणि वाढता मृत्यूदर," असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Kirit Somaiya Tweet:

या घटनेनंतर भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. रिपोर्ट्सनुसार, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.