'जाती'वरुन काही बोललात तर लक्षात ठेवा- नितीन गडकरी
नीतिन गडकरी (फोटो सौजन्य- ट्वीटर)

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) सध्या राजकारणात चर्चेचा विषय बनले आहेत. तर काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे देशाते पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी सांगण्यात आली आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात याबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत.मात्र नागपूर लोकसभेतून प्रतिनिधित्व करणाऱ्या नितीन गडकरी यांनी त्यांच्या क्षेत्रात जातिवादाला थारा नाही. तसेच जर कोणी जातीवरुन काही बोलल्यास मी ते सहन करणार नाही अशा कडक शब्दात विरोधी पक्षावर टीका करण्यात आली आहे.

पीटीआयने (PTI) दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी गडकरी यांनी उपस्थिती लावत जाती वरुन बोलल्यास मी सहन करणार नाही असे म्हटले आहे. तसेच समाजाला आर्थिक आणि सामाजिक समानतेच्या आधारावर एकत्र आणण्याची गरज आहे. मात्र जातिवाद आणि सांप्रादायिकता यांची जागा नसली पाहिजे. (हेही वाचा-नितीन गडकरी पंतप्रधान होणार? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु )

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी गडकरी यांनी केलेल्या टिप्पण्यांवर आणि पंतप्रधान पदाबाबत कळल्यावर चिंता व्यक्त करत आहेत. तर गडकरी माझे चांगले मित्र आहेत. तरीही पंतप्रधान पदासाठी त्यांच्या निवडणीबद्दल मला शंका वाटत असल्याने चिंता शरद पवार यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.