पुणे जिल्ह्यात विजांचा कडकडाटसह अवकाळी पावसाची हजेरी
Pune Rain ( Photo Credit: Twitter)

राज्यात (Maharashtra) पुढील 3 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई आणि पुण्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा तसेच काही ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, आज पुणे जिल्ह्यात विजांचा कडकडाटसह अवकाळी पावसाने हजरे लावला आहे. सध्या पुणे (Pune) जिल्ह्यात कोरोना व्हायरसचे थैमान घातले असताना अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे. राज्यात गहु आणि ज्वारीच्या कापणीचे काम जोरात सुरु आहे. यातच पुण्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तेथील शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे वेधशाळेने कालच राज्यात 5-6 दिवस पाऊस होण्याची शक्यता वर्तवली होती. पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तसेच कोकण आणि मुंबईसह उपनगरांमध्ये 26 ते 28 तारखेपासून हलक्या पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार, पुण्यात आज पावसाने हजेरी लावली. मंगळवारी मध्यरात्रीनंतर पुण्यात पाऊसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर आज सकाळी पावसाने शांतता घेऊन वातावरण स्वच्छ झाले आणि सुर्यप्रकाश असल्याने उकाडाही वाढला. मात्र, अचानक वातावरणात बदल होऊन दुपारी 2 वाजताच्या सुमारास विजांचा कडकडाटासह शहरातील काही भागात पावसाने हजरे लावली आहे. हे देखील वाचा- कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मुंबई आणि पुण्यात पुढील 5 दिवसांत पावसाचा अंदाज

ट्वीट-

सध्या भारतावर कोरोना व्हायरसचे धुमाकूळ घातला आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत महाराष्ट्रात आढळले असून या यादीत मुंबईनंतर पुणे दुसऱ्या स्थानावर आहे. कोरोना व्हायरस वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास संपूर्ण भारतात लॉकडॉऊनची घोषणा केली होती. यामुळे आजपासून पुढील 21 दिवस संपूर्ण देशात लॉकडॉऊन घोषीत करण्यात आला. दरम्यान, लॉकडॉऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेशही नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.