Pune Dam Water Level: खडकवासला धरणाचा जलसाठा वाढला, पुणेकऱ्यांच्या पाण्याची चिंता मिटली

पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी देखील मागच्या महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जलसाठा हा उपलब्ध झाला आहे.

Khadakwasala Dam (PC - Twitter)

पुणे शहरात (Pune city) जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) 4 धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा (Pune Dam Water) जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून शहराला वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा जमा झाल्याने पुणेकर खुष आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी देखील मागच्या महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जलसाठा हा उपलब्ध झाला आहे. खडकवासला (Khadakwasala) प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये आतापर्यंत 26.07 टीएमसी म्हणजे 89.44 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.  (हेही वाचा - Farmers Day 2023: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ यावर्षी 30 ऑगस्ट 2023 रोजी राज्यात साजरा होणार 'शेतकरी दिन')

खडकवासला प्रकल्पातील चारही धरणात 25 जुलै रोजी जास्त पाऊस झाला. त्या दिवशी म्हणजे 24 तासात 1278 दशलक्ष घनफूट आवक होती. त्यानंतर, काही दिवस तो 900,800 दशलक्ष घनफूट पर्यत होता. जुलैच्या शेवटच्या शेवटच्या 24 तासातील आवक 751 दशलक्ष घनफूट होता. शनिवारी 387, रविवारी 309, सोमवारी 191 दशलक्ष घनफूट आवक होती.

धरणांमधील पाणीसाठा

खडकवासला- 92.61 टक्के पाणीसाठा

पानशेत- 97.20 टक्के पाणीसाठा

वरसगाव- 88.33 टक्के पाणीसाठा

टेमघर- 69.32 टक्के पाणीसाठा