पुणे: फुकट्या प्रवाशांना दणका, मध्य रेल्वेने कारवाई करत वसूल केले सात कोटी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने गेल्या नऊ महिन्यांपासून ते आतापर्यंत फुकट्या प्रवाशांना दणका देत तब्बल सात कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये बहुतांश प्रवाशांनी विनातिकिट रेल्वेतून प्रवास केला असल्याची बाब समोर आली आहे. तर प्रवाशांनी जवळच्या मार्गाचे तिकिट काढून लांब अंतरावर प्रवास करणे, साध्या डब्याचे तिकिट काढून आरक्षित बोगीमधून प्रवास करण्याचे प्रकार प्रवाशांनी केले आहेत.

रेल्वे प्रशासनाने पुणे-बारामती, पुणे-मिरज आणि मिरज-कोल्हापूर या मार्गांवर तिकिट तपासणी मोहिम सुरु केली आहे. त्यानुसार एकूण 2 लाख 67 हजार प्रकरणांमधून 14 कोटी 39 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनिल मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली तिकिट तपासणी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. तर गेल्या वर्षात 1 लाख 13 हजार प्रकरणी 6 कोटी 24 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.(मध्य रेल्वेकडून सोलापूर-नागपूर दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या चालवल्या जाणार, जाणून घ्या वेळापत्रक)

त्याचसोबत रेल्वेत महिलांच्या डब्यामधून प्रवास करणाऱ्या 402 पुरुषांवर वर्शभरात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रेल्वे कायद्याच्या तरतुदीनुसार महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात पुरुषांचा प्रवेश बंद होण्यासाठी मोहिम राबवली जाते. त्यानुसार गेल्या वर्षभरात 402 गुन्हा दाखल झाले असून रेल्वेच्या न्यायालयाने 63 हजार 150 रुपयांचा दंड आकारला आहे. तर पुणे, मिरज, कोल्हापूर आणि शिवाजीनगर स्थानकात सीसीटीव्ही लावण्यात आले असून 24/7 तास प्रत्येकावर नजर ठेवण्यात येत आहे.

मध्य रेल्वेकडून यंदा पुण्यातून कोकणात जाणार्‍यांसाठी विशेष ट्रेनची सोय करण्यात आली आहे. पुणे ते एर्नाकुलम दरम्यान यंदा हिवाळा आणि मकरासंक्रांतीचं औचित्य साधून प्रवास करणार्‍यांसाठी 13 जानेवारीपासून विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत. या 4 विकली स्पेशल ट्रेनचं बुकिंग ऑनलाईन माध्यमातून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर 8 जानेवारीपासून बुकिंग सुरू केले जाणार आहे. तर या विशेष ट्रेन 13 ते 20 जानेवारी दरम्यान चालवल्या जाणार आहेत.