A Man Attack His Sister-in-Law: पत्नीला माहेरी पाठवल्याच्या रागातून रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेल्या मेहुणीवर कुऱ्हाडीने वार; पुण्यातील घटना
Crime | (Photo Credits: PixaBay)

पत्नीला माहेरी पाठवल्याच्या रागातून रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेल्या मेहुणीवर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना पुणे (Pune) जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) परिसरात गुरुवारी सांयकाळच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी आरोपीच्या गुन्हा विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पीडित ही आपल्या बहिणीच्या घरी गेल्या असताना त्यावेळी बहिणीचा नवरा तिला मारहाण करत असल्याचे पीडिताच्या लक्षात आले. त्यानंतर पीडिताने आपल्या बहिणीला माहेरी पाठवले आहे. याचाच राग मनात ठेवून आरोपीने पीडिताच्या घरी जाऊन तिच्यावर कुऱ्हाडीने वार केले. या घटनेनंतर संपूर्ण आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

विनोद हिरामण चव्हाण असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. विनोदची पत्नी मुक्ता ही आपल्या पतीसह देहूगाव येथील येलवाडी येथे राहत होत्या. दरम्यान, पीडीत सिंधू कुंडलिक मोहिते आपली बहिण मुक्ताला भेटण्यासाठी तिच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी मुक्ताला मारहाण केल्याचा व्रण त्यांच्या अंगावर असल्याचे सिंधू यांना दिसून आले. त्यामुळे सिंधू यांनी आपली बहिण मुक्ताला तिच्या माहेरी पाठवून दिले. याचा राग मनात ठेवून आरोपी विनोद सायंकाळच्या सुमारास चिखली येथील कृष्णानगर पोलीस लाईन येथे राहात असलेल्या सिंधू यांच्या घरी पोहचला. त्यांच्यात अगोदर शाब्दिक बाचाबाची झाली. पत्नीला माहेरी पाठवल्याचा रागातून रेनकोटमध्ये लपवून आणलेल्या कुऱ्हाडीने डोक्यात, उजव्या हातावर, मानेवर वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती लोकसत्ताने आपल्या वृत्तात दिले आहे. हे देखील वाचा- Husband Kills His Wife: धक्कादायक! पुणे येथे चारित्र्याच्या संशयावरून दुसऱ्या पत्नीची हत्या; पतीला अटक

या घटनेची स्वत: सिंधू कुंडलिक यांनी फिर्याद दिल्यानंतर चिखली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी हा फरार झाला असून त्याचा शोध चिखली पोलीस घेत आहेत. सिंधू या घरात एकट्याच होत्या, त्यांचे पती आणि लहान मुलगी बाहेर गावी गेले होते असे पोलिसांनी सांगितले. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस.उबाळे करत आहेत.