Close
Search

बँकिंग अॅप अपडेट करण्याच्या बहाण्याने सातारा येथील 32 वर्षीय व्यक्तीची 2.27 लाखांची फसवणूक

मोबाईल बँकिंग अॅप अपडेट करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने सातारा येथील 32 वर्षीय व्यक्तीची 2.27 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

महाराष्ट्र टीम लेटेस्टली|

Cyber Crime | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

मोबाईल बँकिंग अॅप (Mobile Banking App) अपडेट करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने सातारा (Satara) येथील 32 वर्षीय व्यक्तीची 2.27 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. बँकेतील ग्राहक सेवा कार्यकारी (Customer Care) असल्याचे भासवत सायबर गुन्हेगाराने (Cyber Criminal) ही आर्थिक लूट केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सायबर गुन्हेगाराने पीडित व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले. त्यासोबत त्याच बँकेत असलेल्या त्याच्या दोन एफडीवर (FD) कर्जही मिळवले.

पीडित व्यक्तीने तक्रार दाखल करण्यासाठी गुरुवारी सातारा शहर पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान, ही घटना 28 सप्टेंबर रोजी चिंचवड येथे घडली. त्यामुळे हे प्रकरण चिंचवड पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आले. (Online Fraud: मुंबईमध्ये निवृत्त IAS Officer ने एअर तिकीट्स ची रिफंड मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये ऑनईन फसवणूकीतून गमावले 4.50 लाख रूपये)

पीडित व्यक्ती ट्वीन टॉऊनसमधील एका खासगी कंपनीत काम करतो. मंगळवारी त्याचे मोबाइल बँकिंग अॅप काम करत नव्हते म्हणून त्याने ऑनलाईन सापडलेल्या एका ग्राहक सेवा क्रमांकावर फोन केला. मात्र तो फोन बँकेच्या कस्टमर केअरला नसून फ्रॉडरचा होता. त्याने  त्याला मोबाईलमध्ये एनीडेस्क अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. फ्रॉडर्स अनेकदा पीडिताच्या मोबाईलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी या अॅपचा गैरवापर करतात, अशी माहिती चिंचवड पोलिसांच्या एका अधिकाऱ्यानी दिली आहे.

अॅप डाऊनलोड केल्यानंतर काही वेळात त्यात लॉन इन कर, असे फॉडरकडून पीडित व्यक्तील सांगण्यात आले. परंतु, जेव्हा पीडित व्यक्तीने त्याच्या खात्यात लॉगिन केले तेव्हा त्याला 24,000 रुपयांऐवजी फक्त 10 रुपये सापडले, असे पोलिसांनी सांगितले.

पीडिताच्या बँकेची शाखा साताऱ्यात असल्याने तक्रारदाराने दुसऱ्या दिवशी तेथे धाव घेतली. तेव्हा त्याला अजून एका धक्का बसला. फ्रॉडर्सने त्याच्या एफडीच्या आधारे बँकेकडे 2.03 लाख रुपयांचे कर्ज मिळवले असल्याची माहिती बँकेतून त्याला मिळाली. द

बँकिंग अॅप अपडेट करण्याच्या बहाण्याने सातारा येथील 32 वर्षीय व्यक्तीची 2.27 लाखांची फसवणूक

मोबाईल बँकिंग अॅप अपडेट करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने सातारा येथील 32 वर्षीय व्यक्तीची 2.27 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

महाराष्ट्र टीम लेटेस्टली|
बँकिंग अॅप अपडेट करण्याच्या बहाण्याने सातारा येथील 32 वर्षीय व्यक्तीची 2.27 लाखांची फसवणूक
Cyber Crime | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

मोबाईल बँकिंग अॅप (Mobile Banking App) अपडेट करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने सातारा (Satara) येथील 32 वर्षीय व्यक्तीची 2.27 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. बँकेतील ग्राहक सेवा कार्यकारी (Customer Care) असल्याचे भासवत सायबर गुन्हेगाराने (Cyber Criminal) ही आर्थिक लूट केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सायबर गुन्हेगाराने पीडित व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले. त्यासोबत त्याच बँकेत असलेल्या त्याच्या दोन एफडीवर (FD) कर्जही मिळवले.

पीडित व्यक्तीने तक्रार दाखल करण्यासाठी गुरुवारी सातारा शहर पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान, ही घटना 28 सप्टेंबर रोजी चिंचवड येथे घडली. त्यामुळे हे प्रकरण चिंचवड पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आले. (Online Fraud: मुंबईमध्ये निवृत्त IAS Officer ने एअर तिकीट्स ची रिफंड मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये ऑनईन फसवणूकीतून गमावले 4.50 लाख रूपये)

पीडित व्यक्ती ट्वीन टॉऊनसमधील एका खासगी कंपनीत काम करतो. मंगळवारी त्याचे मोबाइल बँकिंग अॅप काम करत नव्हते म्हणून त्याने ऑनलाईन सापडलेल्या एका ग्राहक सेवा क्रमांकावर फोन केला. मात्र तो फोन बँकेच्या कस्टमर केअरला नसून फ्रॉडरचा होता. त्याने  त्याला मोबाईलमध्ये एनीडेस्क अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. फ्रॉडर्स अनेकदा पीडिताच्या मोबाईलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी या अॅपचा गैरवापर करतात, अशी माहिती चिंचवड पोलिसांच्या एका अधिकाऱ्यानी दिली आहे.

अॅप डाऊनलोड केल्यानंतर काही वेळात त्यात लॉन इन कर, असे फॉडरकडून पीडित व्यक्तील सांगण्यात आले. परंतु, जेव्हा पीडित व्यक्तीने त्याच्या खात्यात लॉगिन केले तेव्हा त्याला 24,000 रुपयांऐवजी फक्त 10 रुपये सापडले, असे पोलिसांनी सांगितले.

पीडिताच्या बँकेची शाखा साताऱ्यात असल्याने तक्रारदाराने दुसऱ्या दिवशी तेथे धाव घेतली. तेव्हा त्याला अजून एका धक्का बसला. फ्रॉडर्सने त्याच्या एफडीच्या आधारे बँकेकडे 2.03 लाख रुपयांचे कर्ज मिळवले असल्याची माहिती बँकेतून त्याला मिळाली. दरम्यान, लूट केलेल्या रक्कमेचा काही भाग तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील बँक खात्यात आणि काही भाग नवी दिल्लीतील बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला आहे, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change