मुंबईहून म्हसवडला निघालेल्या खासगी बसला अपघात, सुदैवाने सर्व प्रवाशी बचावले
Bus Accident ( Photo Credit: Flickr)

मुंबईहून (Mumbai) फलटणमार्गे म्हसवडकडे (Mhaswad) जाणाऱ्या खाजगी बसला अपघात झाला. यावेळी बसमध्ये 33 प्रवासी असून सुदैवाने सर्व प्रवाशी बचावले गेले आहेत. आज सकाळी पहाटे साडेपाचच्या दरम्यान बाणगंगा नदीच्या (Banganga River) बारामती पुलावरुन (Baramati Bridge) जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. त्यावेळी पुलाचा कठडा तोडून बस पुढे गेली. परंतु, कठड्यात बस अडकल्याने हा मोठा अपघात टळला. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बसमधून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले.

शनिवारी मुंबईहून म्हसवडकडे जाणारी बस फलटणजवळ आलेली असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास बाणगंगा नदीच्या बारामती पुलावरुन जात असताना चालक भानुदास सावंत यांचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस पुलाचा कठडा तोडून पुलामध्ये अडकून पडली. सुदैवाने, बस कोठड्यात अडकल्यामुळे पुलावरुन नदीच्या पात्रात कोसळली नाही. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, बसमधून प्रवास करणारे 33 प्रवास किरकोळ जखमी झाले आहेत.जवळच्या रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना दुसऱ्या बसमधून म्हसवडकडे रवाना करण्यात आले आहे. हे देखील वाचा- कानपूर येथे पूर्वा एक्स्प्रेसला भीषण अपघात; 12 डबे रुळावरून घसरले, अनेकजण जखमी

पहाटे साखर झोपेत असतानाच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे सर्व प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, बस चालक भानुदास सावंत यांनी नियंत्रण मिळवत बस थांबविली. बस पुढे गेली असती तर, मोठी जीवितहानी झाली असते. या घटनेनंतर या बारामती पुलावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती.