Bhendwal Bhavishyavani (Photo Credits: You Tube)

Buldhana Bhendval Prediction: बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळ (Bhendval) च्या घट मांडणीची भाकीते आज जाहीर झाली आहेत. या भविष्यवाणीत राजकीय तसेच देशाच्या स्थितीची भाकीतही सांगण्यात आली आहेत. आज चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या घट मांडणीचे निरीक्षण करून यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली. भेंडवळच्या भविष्यवाणीमध्ये यंदा जून महिन्यात पाऊस कमी असणार असून जुलैमध्ये साधारण आणि ऑगस्टमध्ये प्रचंड पाऊस होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

याशिवाय यंदा अतिवृष्टीचं भाकीतही वर्तवण्यात आलं आहे. यावर्षी शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसणार असल्याचंही भेंडवळीत सांगण्यात आलं आहे. याशिवाय सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस पडणार आहे. यंदा जून महिन्यात कमी अधिक पाऊस येणार असून पेरणीला उशीर होऊ शकतो. तसेच जुलै महिन्यात सर्वसाधारण पाऊस असेल. याशिवाय ऑगस्टमध्ये चांगला पाऊस बरसणार असून अतिवृष्टीची होण्याची शक्यता आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता भेळवंडीच्या भविष्यवाणीत करण्यात आली आहे. (हेही वाचा - Solapur Fire: सोलापूरातील श्री सिद्धेश्वर साखर कारखाना परिसरातील पेपर मिलला भीषण आग (पहा व्हिडिओ))

दरम्यान, या भविष्यवाणीत देशातील राजकारणासंदर्भातही भाकित करण्यात आलं आहे. यंदा राजा कायम राहणार आहे. या भेळवंडीमध्ये घागरीच्या बाजूला ठेवलेला पान विडा म्हणजे राजाचं प्रतीक समजल जात. या पानविड्यावर सुपारी स्थिर असल्याने राजा म्हणजे पंतप्रधान कायम राहील, अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे.

तथापी, घागरी वरील पुरी गायब झाल्याने अतिवृष्टी किंवा भूकंपाचे संकेत देण्यात आले आहेत. तसेच घागरीत पाणी असल्याने समुद्रात भरपूर पाणी राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच यंदा घट मांडणीत पहिल्यांदाच विंचू निघाल्याने देशात रोगराईची परिस्थिती असणार असल्याचं भाकित करण्यात आलं आहे.