महाराष्ट्र: राज्य सरकारने तातडीने सार्वजनिक वाहतूक, छोटी दुकाने आणि मार्केट सुरु करण्यास सुद्धा परवानगी द्यावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी
Prakash Ambedkar (Photo Credits-ANI)

राज्यात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले असून रुग्णांचा आकडा 3 लाखांच्या पार गेला आहे. राज्य सरकारकडून कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास प्रयत्न करण्यात येत आहे. याच दरम्यान आता राज्य सरकारने तातडीने सार्वजनिक वाहतूक सुरु करावी, लहान दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी आणि मार्केट सामान्यपणे सुरु ठेवावे अशी मागणी वंचित बहुजन समाजाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

राज्य सरकारने 5 ऑगस्ट पासून काही गोष्टी सुद्धा सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामध्ये जीम, शॉपिंग मॉल्स सारख्या गोष्टींचा समावेश आहे. परंतु कंन्टेंटमेंट झोन वगळून अन्य ठिकाणी या गोष्टी नियम आणि अटींसह सुरु राहणार आहेत. राज्यात कोरोनाचे दिवसागणिक हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याचे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून उपचार करण्यात येत आहेत. त्याचसोबत कोविड वॉरिअर्स सुद्धा आपले कर्तव्य बजावत आहेत.(मुंबईतील धारावीत कोरोनाचे आणखी 8 रुग्ण आढळल्याने आकडा 2597 वर पोहचला, BMC ची माहिती)

दरम्यान, राज्यातील काही ठिकाणी अनलॉक नुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली होती. परंतु कोरोनाच्या रुग्णांची भर पडण्यासह नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात आल्यानंतर पुन्हा लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले होते. राज्यात कालच्या दिवसभरात 10,309 कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 4,68,265 ऐवढी झाली आहे. तर राज्यात नवीन 6,165 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 3,05,521 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहे.