Power Cuts in Parts of Central Mumbai: फीडर ट्रिपिंगमुळे मध्य मुंबईत काही ठिकाणी वीज कपात
Light | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

मुंबई शहरातील दादर आणि माटुंगा परीसरातील काही ठिकाणी आज (25 मार्च) सायंकाळी वीजपुरवठा खंडीत झाला. फीडरच्या ट्रिपिंगमुळे ही वीजकपात झाल्याचे बेस्टच्या प्रवक्त्यांनी सांगितले. वीज पुरवठा खंडीत झाल्याने काही सामान्य आणि काही व्यावसायिक ग्राहकांना असुविधेला सामोरे जावे लागल्याचेही हे प्रवक्ते म्हणाले.

दरम्यान, वीजपुरवठा खंडीत झाल्याचे काहीच वेळात आमच्या लक्षात आले. त्यानंतर अल्पावधीतच अभियंत्यांचे एक पथक घटनास्थळी गेले आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरु केला. अभीयंत्यांनी अत्यंत तातडीने काम करुन अवघ्या 35 मिनिटांमध्ये हा वीजपुरवठा पूर्ववत केला. अशा प्रकारे वीजपुरवठा खंडीत होण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या आठवड्यातही अशाच प्रकारे वीजपुरवठा खंडीत झाला होता. परंतू, मागच्या वेळीपेक्षा आता अधिक वेगाने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती बेस्ट प्रवक्त्यांनी दिली.

या आधी 19 मार्च या दिवशी हाय होल्टेजमुळे नरीमन पॉइंट येथे फीड ट्रिपींग झाले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या सचिवालय इमारतीचा विद्युतपुरवठा खंडीत झाला होता. त्या दिवशी नरीमन पॉइंट येथील इतरही काही इमारतींमध्ये विजपूरवठा खंडीत झाला होता.