अरबी समुद्रात कमी दाब्याच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळाची शक्यता; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन
येत्या 8 ते 10 तासात अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, परभणी, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली, वर्धा आणि यवतमाळ ह्या ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे.
केरळमध्ये मान्सून सक्रिय झाल्यानंतर आता अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये चक्रीवादळ निर्माण होऊ शकतं असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. परिणामी केरळ, कर्नाटक, कोकण आणि गोव्यातील मच्छिमारांना सुरक्षित राहण्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत. Monsoon 2019: औरंगाबाद, अहमदनगर मध्ये वादळी वार्यासह पाऊस, नाशिक मध्ये 70 वर्षीय महिलेचा मृत्यू
skymet Weather च्या माहितीनुसार चक्रीवादळाच्या इशारानंतर मुंबईसह किनारपट्टीच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामुळे 12 आणि 13 जून दिवशी पावसाची शक्यता आहे. तसेच मासेमार्यांनी या दिवशी समुद्रात न जाण्याचं आवाहनही करण्यात करण्यात आलं आहे. येत्या 8 ते 10 तासात अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, परभणी, पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली, वर्धा आणि यवतमाळ ह्या ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे.
अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ निर्माण झालं तरीही महाराष्ट्रात ते धडकण्याची शक्यता कमी आहे. हे वादळ समुद्रामध्ये किनारपट्टीपासून सुमारे 300 किमी आत राहील. परंतू किनारपट्टीवर वार्याचा वेग असल्याने सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.