बटाट्याचे दर 40 रुपये प्रति किलोवर, सामान्यांच्या खिशाला कात्री
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे दर शंभरीच्या पार गेले होते. कांद्यानंतर टोमॅटो आणि आता बटाट्याचे दर 40 रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. जुन्या बटाट्याचे भाजी मार्केटमधील दर 35 ते 40 रुपये आणि नव्या बटाट्याचे दर 25 त 30 रुपये प्रति किलो झाले आहेत. महाराष्ट्रातील पुणे येथील तळेगाव अन्य जिल्ह्यात बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या महिन्याच्या तुलनेत यावेळी कमी आवक झाल्याने बटाट्याच्या दरात वाढ झाली आहे.

मात्र नव वर्षाच्या सुरुवाती पासूनच गॅस, तेल, इंधन, ज्वारी यासह जीवनावश्क वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. तर आता कांद्यानंतर बटाट्याच्या दर कडाडले आहेत. तर बाजारात बटाट्याची आवक कमी झाल्याने दर 30-40 रुपयांवर पोहचले आहेत. तर काही दिवसांपूर्वीच कांद्यानंतर टोमॅटोचे  दर 45 रुपये किलोवरुन 54 रुपये प्रति किलो झाले होते. तसेच मदर डेअरीच्या सफल आउटलेटमध्ये टोमॅटो 58 रुपये प्रति किलोने विकले गेले. तर अन्य ठिकाणी 60 ते 80 रुपये आणि मुंबईत 54 रुपये दर झाले होते.(मुंबई: गेटवे-मांडवा बोटसेवा पुन्हा सुरु पण तिकिट दरात 5 रुपयांनी वाढ)

तर दुसऱ्या बाजूला सब्सिडी असणाऱ्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सातत्याने पाचव्या वेळेस गॅस सिलिंडरच्या किंमती वाढत आहेत. शहरात घरगुती गॅसच्या किंमती 21.50 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे आता सामान्यांच्या शिखाला चांगलीच कात्री बसणार आहे. एवढेच नाही तर गॅस सिलिंडर सोबत रेल्वेच्या तिकिट दरात ही वाढ करण्यात आली आहे.