Lokshabha Elelction 2024: अमरावतीत राजकारण तापलं, बच्चू कडूंनी राणा दाम्पत्यांवर केली बोचरी टीका

दरम्यान सर्व नेते मंडळीकडून प्रसार प्रचार होताना दिसत आहे.

bachchu kadu And navnit rana PC TWITTER

Lokshabha Elelction 2024:  लोकसभा निवडणूकाचा धुराळा सर्वीकडे आहे. दरम्यान सर्व नेते मंडळीकडून प्रसार प्रचार होताना दिसत आहे. सर्वात चर्चेचा विषय म्हणजे नवनीत राणांनी केलेला प्रसार. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मेळघाटमध्ये आदिवासी महिलांना साड्या वाटल्या होत्या. या साड्या निकृष्ट दर्जाच्या असल्याने आदिवासी महिलांनी साड्याची होळी केली आणि जाळून टाकली होती. याच पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापलं आहे.(हेही वाचा-  छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, कुटुंबीयांना महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी नोटीस)

निकृष्ट दर्जाच्या साड्या वाटल्याने मेळघाटमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. यावरून प्रहार जनशक्तीचे नेते आमदार बच्चू कडूंनी राणे दाम्पत्यावर बोचक टिका केली आहे. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला होता.या मेळाव्यात आमदार बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर टीका केली. १७ रुपयांची साडी देऊन मेळघाटाची बेईज्जती असं त्यांनी म्हटलं आहे.

बच्चू कडू यांनी सांगितले की, प्रचारासासाठी आम्ही काढणारी रॅली ही चित्र बदवून टाकणारी आहे.  २ कोटीच्या गाडीतून फिरायचं आणि १७ रुपयांची साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाका. १७ रुपयाची साडी मत परिवर्तन करू शकत नाही असंही टोला राणांना लगवला आहे. अमरावतीतून नवनीत राणांना दिलेली उमेदवारी ही डोकेदुखी असू शकते असं कार्यक्रमात टीका केली.