Raj Thackeray | (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरोधात अटक वॉरंट (Non-Bailable Warrant Against Raj Thackeray) जारी झाले आहे. बीड (Beed ) जिल्ह्यातील परळी कोर्टाने (Parli Court) हे आदेश दिले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी 2008 मध्ये राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परिवहन मंडळाच्या गाड्यांवर दगडफेक केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरण कोर्टात गेल्यावर अनेकदा आदेश देऊन ही राज ठाकरे तारखेला हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. या वॉरंट नंतर राज ठाकरे न्यायालयात हजर राहणार का, याबाबत उत्सुकता आहे.

न्यायालयाचे वॉरंट आल्यानंत राज ठाकरे हे न्यायालयात हजर राहणार की वेळ वाढवून मागणार याबाबत उत्सुकता आहे. राज ठाकरे यांच्या घरीही कोरोना व्हायरस संक्रमित लोक आढळल आहेत. राज ठाकरे यांचे नवे निवासस्थान 'शिवतीर्थ'वर चार कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी पुढील 10 दिवसांमध्ये नियोजित असलेले सर्व नियोजीत कार्यक्रमही रद्द केले आहेत. दरम्यनच, परळी कोर्टाकडून राज ठाकरे यांना वॉरंट निघाले आहे. (हेही वाचा, Pune: राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान दांपत्यांनी त्यांच्या मुलाचे नामकरण करण्याचा केला आग्रह, मनसे अध्यक्षांनी ठेवले 'हे' नाव (Video))

राज ठाकरे यांनी पाठिमागील महिन्यातच औरंगाबाद दौरा केला होता. त्यांचा हा दौरा एका पदाधिकाऱ्याचे जिल्हाध्यक्षपद काढून घेतल्यामुळे चांगलाच गाजला होता. सुहास दाशरथे असे या पदाधिकाऱ्याचे नाव. दरम्यन, हे पद काढून घेतल्यानंतर दाशरथे यांना विचारले असता, आपले पद जरी काढून घेतले असले तरी आपण मनसे आणि राज साहेबंचा सच्चा सैनिक आहे. त्यामुळे पद असो नसो यापुढेही आपण मनसे सोबतच काम करणार असल्याच त्यांनी सांगितले होते.