पंकजा मुंडे यांच्या नव्या फेसबूक पोस्टमुळे भाजपचे वरिष्ठ नेते, कार्यकर्ते होणार खूश
मात्र, पंकजा मुंडे यांनी आज पुन्हा फेसबुकवर (Facebook) एक पोस्ट केली आहे.
माजी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन भाजपचा उल्लेख हटवल्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, पंकजा मुंडे यांनी आज पुन्हा फेसबुकवर (Facebook) एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी भारतरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना भाजपचे पक्षचिन्हाचा वापर केला आहे. ज्यामुळे पंकजा मुंडे या भाजपसोडून जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच पंकजा मुंडे यांच्या नव्या पोस्टमुळे भाजपचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती, ज्यात त्या 12 डिसेंबरला पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, असा उल्लेख केला होता. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपसोडून शिवसेनेत प्रवेश करणार का? अशा राजकीय चर्चांनी जोर धरला होता.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून पराभव केला होता. त्यानंतर पंकजा मुंडे या शांतच होत्या. परंतु, रविवारी त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहली असून येत्या 12 डिसेंबरला आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या ट्वीटर आणि फेसबूकच्या खात्यावरुन भाजप हा उल्लेख हटवला होता. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे 12 नेते आमच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. यामुळे भाजपमध्ये अधिकच भितीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, आज पंकजा मुंडे यांनी भारतरत्न डॉ. राजेद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना भाजपचे पक्षचिन्हाचा वापर केला. ज्यामुळे पंकजा मुंडे भाजप सोडून जाणार नाहीत, असे संकेत मिळत आहेत. यामुळे भाजपमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला पंकजा मुंडे यांच्या ट्विटला उत्तर; गोपीनाथ मुंडे यांचा केला उल्लेख
पंकजा मुंडे यांची फेसबूक पोस्ट-
पंकजा मुंडे भाजपसाठी नेहमी मोठे योगदान दिले असून त्यांनी सातत्याने त्यांची जबाबदारी पार पाडली आहे. पंकजा मुंडे यांना प्रदेशाध्यश पदी किंवा विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात यावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्यांनी करत होते. त्याचबरोबर येत्या १२ डिसेंबरला पंकजा मुंडे कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.