Ashadhi Wari 2024: पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Vitthal Rukmini (Photo Credit: Twitter/@PandharpurVR)

पंढरपुरात (Pandharpur News) आपल्या लाडक्या विठूरायाचे भक्त दर्शन रांगेत हजारो भाविक काल मंदिरात दिवसभर व्हीआयपीकडून (VIP) झटपट दर्शनासाठी गर्दी केल्याने दर्शन रांगेतील गोरगरीब भाविकांना 14 तासापेक्षा जास्त वेळ लागत होता . यातच पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने भाविकांचे मोठे हाल झाले होते . संतप्त भाविकांची ही व्यथा समोर आणल्यानंतर मंदिर प्रशासन खडबडून जागे झाले . आजपासून कोणत्याही व्हीआयपी भाविकांना देवाच्या झटपट दर्शनासाठी न सोडल्याने काळ तासंतास एकाचजागी थांबलेली दर्शन रांग आज जोराने धावू लागली आणि केवळ 4 ते 5 तासात भाविकांना देवाचे दर्शन होऊ लागले. ( Ashadhi Wari 2024 Special Trains: आषाढी वारीसाठी मध्य रेल्वे पंढरपूर आणि मिरजसाठी चालवणार 64 गाड्या; वाचा सविस्तर)

काल भाविकांनी थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन करीत आषाढी काळात येणाऱ्या भाविकांना आमच्या प्रमाणे दर्शन रांगेतून दर्शन घेऊ द्या अशी मागणी केली होती . यानंतर वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली आणि अखेर आज सकाळीपासून मंदिर प्रशासनाने कोणत्याही व्हीआयपी भाविकाला घुसखोरी करून झटपट दर्शन करू दिले नाही . आज सकाळीपासून पळू लागली आणि दर्शन रांगेतील भाविकांना केवळ 4 ते 5 तासात दर्शन मिळू लागले.

आषाढी काळात कोणीही व्हीआयपी मंडळींनी झटपट दर्शनासाठी आग्रह धरू नये असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.  एकंदर आज देखील काल एवढीच गर्दी असताना काल जिथे 14 ते 15 तास दर्शनाला लागत होते तिथे आज केवळ चार ते पाच तासात देवाचे दर्शन घडत होते .