विरार: मुंबई लोकलमधून पडून तरूणाचा दुर्दैवी अंत; अपघातानंतर 25 मिनिटं स्टेचरच्या प्रतिक्षेत गमावला जीव
Western Railway (Photo Credits: File Photo)

मुंबई लोकलमधून पडून एका 28 वर्षीय तरूणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. विरार स्टेशनवर तब्बल 25 मिनिटं स्टेचरच्या प्रतिक्षेत असलेल्या जखमी तरूणाचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. मिरर नाऊच्या बातमीनुसार, सोमवार (9 सप्टेंबर) च्या सकाळी स्वप्नील किनी हा तरूण लोकल ट्रेनमधून वैतरणा जवळ पडला. पालघर येथील सफाळे भागात राहणार्‍या स्वप्नीलचा वेळेत स्टेचर न मिळाल्याने मृत्यू झाला आहे.

स्वप्नील विरार कडून मुंबईकडे जाणार्‍या लोकल ट्रेनमध्ये सकाळी 7 वाजता चढला. सकाळच्या वेळेत असलेल्या गर्दीमध्ये धक्काबुक्की झाल्याने चालत्या लोकलमधून तो वैतरणा स्टेशनजवळ पडला. स्वप्नीलचा मित्र सुजित मोहिते यांनी त्याला मदत करून विरार स्टेशनपर्यंत आणले. मात्र तेथे पोलिस आणि रेल्वे प्रशासन वेळेत स्वप्नीलला मदत करू शकले नाही, त्यांना स्ट्रेचरची सोय देखील तात्काळ करणं शक्य नव्हते असा आरोप केला आहे. स्वप्नीलच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. तसेच त्याला हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत तो शुद्धीत होता, त्याला वेदना जाणवत असल्याचं त्याच्या मित्राने सांगितले आहे. 108 या रूग्णवाहिकेची सोय देणार्‍या नंबर वरही सेवा उपलब्ध नसल्याने

नाईलाजास्तव स्वप्नीलला व्हीलचेअरच्या मदतीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्ताला प्राथमिक मदत आणि रूग्णवाहिकेपर्यंत पोहचण्यासाठी व्हिलचेअर देण्यात आली होती. मुंबई: विरार लोकल मधून प्रवाशाने फेकलेल्या निर्माल्यातील नारळामुळे महिला जखमी

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते डहाणू पर्यंत आझाद गॅंग आहे. या मध्ये चार मदतनीस आहेत. मात्र जानेवारीमध्ये घोषणा करण्यात आलेल्या या योजनेची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने ते विरार स्टेशनवर उपलब्ध नव्हते.