पालघर येथे गेल्या 24 तासात आणखी 284 कोरोना संक्रमितांची भर पडल्याने आकडा 14 हजारांच्या पार
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह पालघर (Palghar) येथे सुद्धा कोरोना संक्रमितांची संख्या सर्वाधिक आहे. याच दरम्यान आता पालघर येथे गेल्या 24 तासात आणखी 284 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 14 हजारांच्या पार गेला आहे. जिल्ह्यात कोविडच्या रुग्णांची संख्या न थांबण्याचे नाव घेत नाही आहे.(औरंगाबाद येथे आणखी 66 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, जिल्ह्यातील COVID19 चा आकडा 13 हजारांच्या पार)

राज्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी करण्याकडे सरकार विशेष लक्ष देत आहे. त्याचसोबत रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून ऑक्सिजन युक्त असलेल्या बेड्सची सुविधेसह क्वारंटाइन सेंटर्सची उभारणी करण्यात येत आहे. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने डॉक्टर्स, नर्स, वैद्यकिय कर्मचारी रुग्णांवर अहोरात्र उपचार करुन त्यांची प्रकृती सुधरावत आहेत. तसेच राज्यात कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. मात्र उर्वरित ठिकाणी 'मिशन बिगिन अगेन' नुसार काही गोष्टी अनलॉकिंगनुसार सुरु करण्यास सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे.(नाशिक: मेणबत्तीच्या प्रकाशात सॅनिटायझर करताना आगीचा भडका उडाल्याने एका महिलेचा मृत्यू)

महाराष्ट्रात काल तब्बल 9 हजार 431 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 75 हजार 799 वर पोहचली आहे. यापैकी 2 लाख 13 हजार 238 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, राज्यात सध्या 1 लाख 48 हजार 601 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत.