Representative Image (फाईल फोटो)

पालघर (Palghar) मधील गडचिंचले साधू हत्याकांड ( Mob Lynching Case) प्रकरणातील 89 आरोपींना जामीन मंजूर केला आहे. या आरोपींची ठाणे कोर्टाने (Thane Court) 15 हजारांच्या जामिनावर अटींसह मुक्तता केली आहे. या घटनेदरम्यान हे सर्व आरोपी केवळ घटनास्थळी हजर होते. यामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी ठाणे कोर्टाने 47 जणांना जामीन मंजूर केला होता. 16 एप्रिल रोजी पालघरच्या सीमावर्ती भागामध्ये गुजरातकडे जाणाऱ्या दोन साधूंसह तिघांची जमावाने निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी असताना कांदिवली (मुंबई) येथून गुजरात राज्यात आडमार्गाने प्रवेश घेऊ पाहणार्‍या चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (70 वर्ष), सुशिलगिरी महाराज (35 वर्ष) आणि निलेश तेलगडे (30 वर्ष) या तिघांची महाराष्ट्र व दादरा नगरहवेली केंद्रशासित प्रदेशाच्या हद्दीजवळ डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे गावकऱ्यांनी अमानुषपणे मारहाण करून निर्घृणपणे हत्या केली होती. हे देखील वाचा- धक्कादायक! बहिणीच्या प्रियकरावर भावाने केले कोयत्याने वार, 4 संशयितांना अटक

एएनआयचे ट्विट-

पालघरमधील या साधू हत्याकांड प्रकरणी पोलिसांना एकूण 163 लोकांना पकडले होते. ज्यामध्ये 12 आरोपी अल्पवयीन होते. या पालघर साधू हत्याकांड प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. याप्रकरणी 4 हजार 955 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.