ऑक्सफोर्ड कोविड-19 लसीच्या (Oxford COVID-19 vaccine) क्लिनिकल ट्रायल्सच्या (Clinical Trial) दुसऱ्या टप्प्यातील परिणाम नॉर्मल असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारी (27 ऑगस्ट) दिली आहे. या चाचणीसाठी पुढे आलेल्या 2 स्वयंसेवकांपैकी दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे समोर आले आहे. 32 आणि 48 वर्षीय दोन स्वयंसेवकांना कोविडशिल्ड (Covishield) लसीचा पहिला डोस देण्यात आला. पुणे (Pune) स्थित भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) यांनी या लसीचे उत्पादन केले आहे. (Covisheild या कोरोना लसीच्या उत्पादनाला परवानगी असली तरी विक्रीबाबत अद्याप निर्णय नाही- Serum Instititute)
आता एका महिन्यांनंतर या दोन स्वयंसेवकांना दुसरा डोस देण्यात येईल. मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे डेप्युटी मेडिकल डिरेक्टर डॉक्टर जितेंद्र ओसवाल यांनी सांगितले की, "कालपासून आमची मेडिकल टीम दोन्ही व्यक्तींच्या संपर्कात असून त्या दोन्ही स्वयंसेवकांची प्रकृती स्थिर आहे. लसीच्या डोसनंतर दोन्ही स्वयंसेवकांमध्ये कोणतेही दुखणे, ताप किंवा दुष्परिणाम दिसून आले नाही."
बुधवारी, दोन्ही स्वयंसेवकांना लसीचा पहिला डोस दिल्यानंतर 30 मिनिटे डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते. या दोन्ही व्यक्तींना काहीही त्रास जाणवल्यास त्यांना वैद्यकीय मदतीसाठी सर्व संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. पुढील 7 दिवसांमध्ये 25 जणांना या लसीचा डोस देण्यात येईल अशी माहिती हॉस्पिटलचे मेडिकल डिरेक्टर डॉ. संजय ललवानी यांनी दिली.
मेडिकल कॉलेज रिसर्ज सेलच्या इंन्चार्ज डॉ. सोनाली पालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लस देण्यासाठी 4-5 जणांची स्क्रिनिंग टेस्ट करण्यात आली होती. या व्यक्तींच्या कोविड-19 रिपोर्ट आणि अँटीबॉडी टेस्ट रिपोर्ट्सवरुन कुठल्या व्यक्तीला लस द्यायचे हे ठरवण्यात आले. ऑक्सवर्ड युनिव्हर्सिटीच्या जेनर इंस्टिट्युटने बनवलेल्या या लसीचे निर्मिती करण्याचा करार जगातील सर्वात मोठ्या लस कंपनी SII ला दिला आहे.