वसई: वाळीव पोलीस स्थानकातील आणखी एका 38 वर्षीय कर्मचाऱ्याचा COVID19 मुळे मृत्यू
Maharashtra Police | (File Photo)

वसई पूर्वेतील वाळीव पोलीस स्थानकातील एका 38 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. वाळीव पोलीस स्थानकात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे. सदर पोलीस कर्मचारी हा ठाण्यातील मुरबाड जिल्ह्यातील रहिवाशी होता. कॉन्स्टेबल भालेराव नाईक असे त्यांचे नाव असून कोरोनाच्या उपचारासाठी त्यांना नालासोपारा मधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पालघर जिल्ह्यात आतापर्यंत दोन पोलिसांचा जीव गेला असून ते दोघेही वाळीव पोलीस स्थानकातील कर्मचारी होते. 9 जून रोजी कॉन्स्टेबल किरण सांळुखे (40 वर्षीय) यांचा सुद्धा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.(पुण्यात लॉकडाऊन लागू होणार असल्याने सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडवत नागरिकांची खरेदसाठी तुफान गर्दी)

पालघर जिल्ह्यात वाढत्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे गेल्याच महिन्यात वाडा तालुक्यात कोविड रुग्णालय सुरु करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत 78 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तर मुंबईतील 46 जणांचे ही कोरोना व्हायरसमुळे निधन झाले आहे. तर महाराष्ट्रातील पोलिसांना कोरोनाची लागण होत असल्याने 55 वर्षावरील कर्मचाऱ्यांनी कोविडच्या महासंकट काळात काम करणार नाहीत असा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. (Coronavirus in Maharashtra: मुंबई, पुणे, रत्नागिरीसह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांतील कोरोना बाधितांची एकूण संख्या किती? जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स)

गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 7,827 नवे कोरोना रुग्ण आढळून आहे आहेत. तर दिवसभरात 173 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,54,427 इतकी झाली आहे. आतापर्यंत राज्यात 1,40,325 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु, दुर्देवाने 10,289 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईसह ठाणे, पुणे, पालघ येथे सुद्धा कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.