Nanded: दुचाकी, चारचाकी नव्हेतर थेट घोड्यावरून ऑफिसला येणार; नांदेड येथील एका कर्मचाऱ्याचे पत्र व्हायरल
horse (Photo Credit: Pixabay)

कोरोना महामारीमुळे राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले कार्यालय पुन्हा एकदा सुरु झाले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता बहुतेक कर्मचारी वर्क फ्रॉम होमच करत आहेत. महत्वाचे म्हणजे, कार्यालयात जाण्यासाठी अनेक कर्मचारी सोयीप्रमाणे दुचाकी, चारचाकी आदी वाहनाचा वापर करत असल्याचे आपण पाहिले आहे. परंतु, नांदेडच्या (Nanded) एका कर्मचाऱ्याने घोड्यावरून ऑफिसला येण्यासाठीची परवानगी मागितली आहे. यासाठी त्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालयालाच पत्र लिहले आहे. हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पत्रानुसार, सतिष पंजाबराव देशमुख असे पत्र लिहणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सतिष हे नांदेड जिल्हाधिकरी कार्यालय येथील रोजगार हमी योजना विभागात सहाय्यक लेखाधिकारी या पदावर कार्यरत आहेत. परंतु, सतिष यांना पाठीच्या कण्याचा त्रास आहे. ज्यामुळे दुचाकीवरून ऑफिसला येण्यास त्यांना समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणून त्यांनी घोडा खेरदी करण्याचे ठरविले आहे. घोड्यावर बसून विहीत वेळेत कार्यालयातमध्ये येणे त्यांना शक्य होणार आहे. तसेच कार्यलयात घोडा आणल्यास त्याला कार्यालयीन परिसरात बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. हे देखील वाचा- Satara: इंधनाचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर अन् साताऱ्यातील विहिरींतून पाण्याऐवजी निघतयं पेट्रोल

पत्र-

सध्या हे पत्र सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या पत्रावर नेटकऱ्यांकडून मजेदार कमेंटचा वर्षाव केला जात आहे. एवढेच नव्हेतर, हे पत्र प्रसारमाध्यांतही झळकत आहे.