Coronavirus: नाशिक शहरातील 759 पैकी 459 रुग्ण कोरोनामुक्त!
प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणू (Coronavirus) जाळे अधिक वेगाने पसरत चालले असताना नाशिककरांना (Nashik) दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. नाशिक शहरात आतापर्यंत 759 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 459 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक 377 कोरोनाबाधीत रुग्ण मालेगाव येथील आहेत. यामुळे नाशिक येथील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. नाशिक येथे गेल्या 24 तासांत 16 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 168 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यामुळ खबरदारीचा उपाय म्हणून काही भाग रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनचे  विभाजन करण्यात आले आहेत.

कोरोनामुक्त रुग्णांची वाढती संख्या जिल्हावासीयांसाठी दिलासादायक आहे. आतापर्यंत 459 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यात सर्वाधिक 377 रुग्ण मालेगावातील आहेत. आजमितीस मालेगावात 177 तर, जिल्ह्यात 258 कोरोनाबाधीत रुग्ण उपाचार घेत आहेत. आतापर्यंत 33 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. नवीन डिस्चार्ज पद्धतीचा अवलंब करण्यात आल्याने लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. तसेच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी रुग्णांना बरे करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत आहेत. हे देखील वाचा- महाराष्ट्रात अत्यावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत छत्री, रेनकोटचाही समावेश; कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

ट्वीट-

महाराष्ट्रात दिवसेगणिक कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ होत असल्याचे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 27 हजार 524 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 1,019 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 6,059 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.