महाराष्ट्रात तापलेल्या राजकरणाच्या पार्श्वभुमीवर सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत घेतली सोनिया गांधी यांची भेट
Supriya Sule | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात सध्या राजकरण तापल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. तर 100 कोटींच्या वसूलींच्या आदेशावरुन राज्य सरकारकला विरोधकांनी घेरले आहे. अशातच मित्रपक्षांनी केलेली विधाने सुद्धा चर्चेत आहेत. याच संकटादरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतली आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत:हून याची ट्विट करत माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी सोनिया गांधी यांचे आभार सुद्धा मानले आहेत. खरंतर बुधवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या घरी महाराष्ट्रातील सर्व खासदारांसाठी डिनर पार्टीचे आयोजन केले होते. त्यासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य दिग्गज राजकीय मंडळींनी उपस्थिती लावली होती.

सोनिया गांधी यांची सुप्रिया सुळे यांनी घेतलेली भेट ही खास मानली जात आहे. कारण सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असून याच दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी युपीए गटबंधनाच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची निवड करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली होती.(Param Bir Singh यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत होणार चौकशी; महाविकासआघाडी सरकारचा निर्णय)

Tweet:

ऐवढेच नाही तर शरद पवार यांनी त्यांच्या एका विधानात संकेत दिले होते की, आता विरोधी पक्षांनी नॉन-काँग्रेस समीकरणावर जोर द्यायला पाहिजे. त्यामुळे भाजपा एकत्रितपणे लढा देऊ शकेल. या दोन्ही विधांनावर काँग्रेसकडून कोणतीही मोठी रिअॅक्शन आली नाही. परंतु पक्षात हालचाली सुरु आहेत हे नक्की. सुत्रांच्या मते, काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी सुद्धा या संपूर्ण विवादावर अपडेट्स घेतले आहेत.(Antila Bomb Scare Case: सचिन वाझे विरोधात NIA कडून UAPA अंतर्गत गुन्हा दाखल; जाणून घ्या नक्की काय आहे कलम)

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसूली आणि अँन्टेलिया प्रकरणी महाराष्ट्र सरकारवर सातत्याने निशाणा साधला आहे. दुसऱ्या बाजूला भाजपने सुद्धा महाराष्ट्र सरकारला याच कारणांमुळे घेरले आहे.