पवार कुटुंबात उभी फूट, सुप्रिया सुळे यांच्या WhatsApp स्टेटसची चर्चा
सुप्रिया सुळे व्हॉट्सअॅप स्टेटस (Photo Credits-ANI/File Image)

महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यानंतर आता मोठा राजकीय ट्वीस्ट पहायला मिळाला आहे. तर अजित पवार यांनी भाजप सोबत जात उपमुख्यंत्री पदाची शपथ घेतली. यावर शरद पवार यांनी सुद्धा अजित पवार यांचा भाजपला पाठिंबा हा वैयक्तिक निर्णय असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचसोबत राष्ट्रवादी या निर्णयाच्या विरोधात असल्याची भुमिका शरद पवार यांनी ट्वीटच्या माध्यमातून मांडली आहे. यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचे व्हॉट्सअॅप स्टेटस सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होत आहे. त्या स्टेटमधून असे दिसून येत आहे की पक्षात आणि परिवारात या सर्व गोष्टींमुळे फुट पडली आहे.

पवार कुटुंबात उभी फूट पडली असल्याचे सुप्रिया सुळे यांचे व्हॉट्सअप स्टेटस सध्या चर्चेत आले आहे. तसेच प्रसार माध्यमांना अद्याप सुप्रिया सुळे यांनी सत्ता स्थापनेबाबत कोणतेही अधिकृत भुमिका स्पष्ट केलेली नाही. तसेच व्हॉट्सअॅप स्टेटसबाबत सुद्धा सुप्रिया सुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर स्पष्टीकरण देण्यात येईल असे म्हटले आहे. हे सर्व बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी दिसून आले. दसऱ्या बाजूला भाजपने सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपदाची ऑफर दिल्याची सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.(Maharashtra Government Formation: भाजपला राज्यात बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत)

ANI Tweet: 

तर दुपारी 12.30 वाजता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षात पडलेल्या या मोठ्या भुकंपाबाबत काय भुमिका घेतली जाणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचसोबत अजित पवारांची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर काँग्रेस आमदार जेष्ठ नेत्यांवर नाराज झाल्याचे सांगण्यात येत आहे.