Coronavirus: सध्या संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसची (Coronavirus) दहशत पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांचा नाशिक दौरा (Nashik Visit) रद्द करण्यात आला आहे. तसेच कळवण तालुक्यातील शेतकरी मेळावाही रद्द करण्यात आला आहे.
मागील आठवड्यामध्ये नाशिकमध्ये कोरोनाचे 4 संशयित रुग्ण आढळले होते. परंतु, त्यांची तपासणी निगेटिव्ह आली आहे. मात्र, तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवार यांनी नाशिक दौरा रद्द केला आहे. (हेही वाचा - मनसेचे शॅडो कॅबिनेट जाहीर: जाणून घ्या अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमेय खोपकर, शालिनी ठाकरे, अनिल शिदोरे आदी नेत्यांकडे कोणती जबाबदारी)
दरम्यान, शरद पवार यांनी मोदी सरकारकडे जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकारने स्थानबद्ध केलेल्या नेत्यांची सुटका करण्याची मागणी केली आहे. जम्मू आणि काश्मीरचे 3 माजी मुख्यमंत्री आणि राजकीय नेत्यांची तात्काळ सुटका करावी, अशा आशयाचं पत्र त्यांनी पंतप्रधानांना पाठवलं आहे. शरद पवार यांच्या या मागणीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांनीदेखील समर्थन दिलं आहे.
भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. आज भारतात एका 3 वर्षीय चिमुकल्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. या मुलामध्ये कोरोना व्हायरसची लक्षण आढळली आहे. हा मुलगा त्याच्या परिवारासोबत इटलीहून केरळमध्ये आला होता. सध्या भारतात कोरोना व्हायरस संशंयित रुग्णांची संख्या 43 झाली आहे.