Navi Mumbai: खारघर येथील वाहतूक पोलिसाला चौकीत रिक्षाचालकाकडून मारहाण, आरोपीने केले पलायन
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- Pixabay)

Navi Mumbai: खारघर येथे ऑनड्युटी असलेल्या वाहतूक पोलिसाला ट्राफिक चौकीत मारहाण केल्याचा प्रकार 11 जानेवारी रोजी घडला होता. या प्रकरणी रिक्षाचालकाने वाहतूक पोलिसाला लोखंडी रॉडने मारहाण केल्याने त्याच्या हाताला दुखापत झाली. या प्रकरणी पोलिसांकडून आता आरोपी रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत. राकेश घाडगे असे वाहतूक पोलिसाचे नाव आहे. आरोपीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याची रिक्षा ही पोलिसांनी जप्त केली असून ती त्याला एका महिलेने भाडेतत्त्वावर दिल्याचे तिने म्हटले आहे.

एफआयआर नुसार घाडगे हे 11 जानेवारीला रात्री ड्युटीवर होते. तेव्हा एक अज्ञात व्यक्ती रिक्षाचालकाचा पोषाशात हातात एक लोखंडी रॉड घेत ट्राफिक चौकात शिरला. खारघरच फ्लाओव्हरच्या खाली असलेल्या सायन-पनवेल महामार्गाजवळ त्याने घाडगे यांच्यावर हल्ला केला. त्यांनी स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना दुखापत झाली.(Cyber Crime: बँकेकडून कर्ज मिळवून देण्याचे बहाण्याने पुण्यातील 40 वर्षीय व्यक्तीची 10.62 लाखांची फसवणूक)

हल्ल्याच्या वेळी घाडगे यांनी व्यक्तीला लाथ मारली असता तो खाली पडला. या सर्व प्रकारामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होत घाडगे यांचा सहकारी मनोज पाटील तेथे येत त्याने त्यांना वाचवले. परंतु आरोपीने थ्री स्टार हॉटेलच्या दिशेने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु अंधाराचा फायदा घेत तो निसटला. घाडगे यांना नंतर एका रिक्षाचे इंजिन सुरु असून ती महामार्गाच्या येथे पार्क करण्यात आल्याचे दिसून आले. ही रिक्षा त्या आरोपीचीच असणार असा त्यांनी अंदाज बांधला.

रिक्षाची झडती घेतली असता त्यांना सीटच्या खाली चाकू मिळाला. त्यानंतर घाडगे यांनी रिक्षाचे चलन क्रमांक तपासून पाहिले तेव्हा त्यावर 1500 रुपयांचे इ-चलन त्याच दिवशी संध्याकाळी 7.05 वाजताचे असल्याचे दिसून आले. इ-चलन पाठवल्यानेच संतप्त झालेल्या रिक्षाचालकाने हा हल्ला केल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणी घाडगे यांनी पोलिसात आरोपीच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. तसेच त्याच्यावर भारतीय कायद्यानुसार कलम 342, 332 आणि 353 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.