Mumbai News: उलवे रोडवर अपघात, कारचा बाईकला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

ऐरोली येथे कामावरून घरी परतत असताना एका 39 वर्षीय व्यक्तीच्या दुचाकीला कारलाने धडक दिल्याने आपला जीव गमवावा लागला.

Mumbai News: उलवे रोडवर अपघात, कारचा बाईकला जोरदार धडक, एकाचा मृत्यू
Accident (PC - File Photo)

Mumbai News: ऐरोली येथे कामावरून घरी परतत असताना एका 39 वर्षीय व्यक्तीच्या दुचाकीला कारलाने धडक दिल्याने आपला जीव गमवावा लागला. ही घटना सोमवारी मध्यरात्री उलवे पुलावर घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांनी घटनास्थळी जावून जखमीला रुग्णालयात दाखल केले. कामावरून घरी जात असताना, ही दुर्घटना घडली. कामावरून दुचाकीवरून पसतत असताना ते उलवे रोडवरून जात होते. एक कार भरधाव वेगाने येत होती तेवढ्यात बाईकला धडक दिली.

मीडिया रिपोर्टनुसार, योगेश राजगुरु असं मृतदेहाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,योगेश ऐरोली येथून रात्रीच्या वेळी कामावरून घरी येण्यास निघाले होते. उलवे रोडजवळ त्यांना भरधाव कारने धडक दिली. योगेश बाईकवरून खाली पडले. ते गंभीर जखमी झाले. पोलीसांनी घटनेची माहिती देण्यात आली. पोलीसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

योगेशला धडकणाऱ्या कार चालकाचे नाव सुहास रासकर असे आहे. सुहासविरुद्ध एफआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.योगेशच्या कुटूंबात पोलिसांनी या घटनेची माहिती दिली.

(The above story first appeared on LatestLY on Oct 10, 2023 01:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).