दारूच्या नशेत पोलीस झाले गुंड!  गुन्हेगारांच्या सोबत बार मालकाला बेदम मारहाण
प्रतिकात्मक प्रतिमा (File Image)

पोलीस म्हणजे रक्षक ही सर्वसामान्य अपेक्षा नाशिक (Nashik) मधील एका बार मध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे भंग झाली आहे. नाशिकच्या लेखा नगर (Lekha Nagar) भागातील एका बार मध्ये पोलिसांनी चक्क गुन्हेगारांच्या सोबत मिळून बार च्या मालकालाच बेदम मारहाण केल्याचे समजत आहे. हा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून यावर लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जातेय. कायद्याच्या रक्षकांकडून अशा कृती केली जात असल्याने जनतेकडून तीव्र विरोध केला जात आहे. पत्नीचे डोके कापून पोलिसांकडे घेऊन गेला माथेफिरू; चौकशी करताच म्हणू लागला राष्ट्रगीत, वाचा सविस्तर

प्राप्त माहितीनुसार, या पोलिसांचे नाव एकनाथ जाधव व त्यांचे साथीदार पप्पू कांबळे असे आहे. लेखानगर येथे बिअर बार मध्ये बिल देण्यावरून पोलिसाने सराईत गुन्हेगाराच्या मदतीने बार चालकाला मारहाण केली होती. हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाल्या नंतर अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लेखा नगर येथील हॉटेल स्पॅक्स मध्ये पोलीस कर्मचारी भगवान एकनाथ जाधव हा त्याच्या साथीदारांसोबत बिअर घेण्यासाठी गेला होता. बिअर घेतल्यानंतर बारचालक भास्कर येतप्पा शेट्टी याने जाधव कडे पैशाची मागणी केली. मात्र मी पोलीस असून तुझ्याकडे बघून घेतो असे म्हणत शिवीगाळ केली.

दरम्यान, घटनेनंतर बारचालक शेट्टी याने अंबड पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केलीय. याबाबत अधिक तपास अंबड पोलीस करीत आहेत.