नारायण राणे 'स्वाभिमान' पक्षातून लोकसभा निवडणुकीसाठी पाच जागा लढवणार?
नारायण राणे (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे (Maharashtra Swabhimaan Paksh) अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) काँग्रेस (Congress) पक्षात घरवापसी करणार असल्याचे संकेत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat)यांनी दिले होते. परंतु आता नारायण राणे स्वाभिमान पक्षातून लोकसभेच्या पाचा जागा लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहेत. तर सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चा झाल्याचे त्यांच्या सूत्रांकडून कळले आहे.

भाजप पक्षात नारायण राणे यांचे मन रमत नाही. तसेच भाजप (BJP) मधून राज्यसभेत खासदारकीचे पद भूषवत आहेत. काँग्रेस पक्ष सोडून गेलेले ही पुन्हा घरवापसी करत असल्याचे थोरात यांनी म्हटले होते. मात्र नितेश राणे यांनी खुद्द नारायण राणे काँग्रेस पक्षात जाणार नसल्याचे ट्वीटरवरुन सांगितले आहे. (हेही वाचा -नारायण राणे यांची पुन्हा काँग्रेस पक्षात घरवापसी होणार?)

येत्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि नारायण राणे यांच्यामध्ये एक चर्चा झाली. त्यावेळी नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष राज्यातील लोकसभेच्या पाच जागा लढविणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग, सातारा-कोल्हापूर येथील एक, सोलापूरमधील एक जागा आणि औरंगाबाद येथील एक अशा एकूण पाच जागांसाठी निवडणुक लढविणार असल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.