Sanjay Raut on Narayan Rane: एका अतिशहाण्याने पंतप्रधान मोदी यांचेही ऐकले नाही- संजय राऊत
Sanjay Raut on Narayan Rane | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या मंत्र्यांना आपल्या मंत्रीपदाची, केंद्र सरकारने केलेल्या कामाची माहिती आणि प्रसार करण्याची जबाबदारी दिली. परंतू, एका अतिशाहण्याने पंतप्रधान मोदी यांचेही ऐकले नाही. केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी यांचा प्रचार, काम याची माहिती, प्रचार न करता केवळ शिवसेना (Shiv Sena), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत (Sanjay Raut), महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यास सुरु केली, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत हे नाशिक येथे एका आयोजित सभेत बोलत होते.

संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधताना संजय राऊत यांनी म्हटले की, मला माहिती आहे. पंतप्रधान मोदी यांनी काय सांगितले आहे. मोदी सांगतात की मंत्रिमंडळात ज्यांचा नाव्याने समाेवश झाला आहे. त्या मंत्र्यांनी आपापल्या राज्यांमध्ये जाऊन आपल्या मंत्रीपदाची, केंद्र सरकारने केलेल्या कामाची माहिती आणि प्रसार करावा.परंतू, यांनी ते ठेवले बाजूला आणि शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, महाविकास आघाडी यांच्यावरच टीका करायला सुरुवात केली. (हेही वाचा, 'आजही राणेंमुळे शिवसेनेत पदं मिळतात'; खास फोटो पोस्ट करत नितेश राणे यांचा निशाणा)

संजय राऊत यांनी पुढे बोलताना सांगितले की, मंत्र्यांची भाषा सभ्य असावी. आपण घटनात्मक पदावर गेल्यानंतर अधिक जबाबादार झाले पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाची शपथ घेतल्यापासून एकदाही अपशब्द काढला नाही. त्यांचा तोल कधीही ढळला नाही अशा शब्दात राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. तर, दुसऱ्या बाजूला नारायण राणे यांच्यावर टीका करताना म्हटले की, हे महाशय महाराष्ट्राच्या विमानतळावर उतरल्यापासून यांची जीभ सातत्याने घसरत आहे. वारंवार घरसणाऱ्या जीभेला एकदा लगाम घालणे गरजेचेच होते. जो मुख्यमंत्र्यांनी घातला. मंत्री कोणीही असले तरी त्यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखणे गरजेचेच आहे, असेही राऊत म्हणाले.