Nana Patole on Sameer Wankhede: आर्यन खान याला क्लिन चिट मिळताच समीर वानखेडे यांच्याबद्दल नाना पटोले यांचे परखड भाष्य
सबळ पुरावे नसल्याचे कारण देत एनसीबीने हे आरोप रद्द केले. त्यामुळे ही कारवाई करणारे मुंबई एनसीबी (NCB) प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
[Poll ID="null" title="undefined"]क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आणि इतर सहा जणांवर असलेले आरोप केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) शुक्रवारी रद्द केले. सबळ पुरावे नसल्याचे कारण देत एनसीबीने हे आरोप रद्द केले. त्यामुळे ही कारवाई करणारे मुंबई एनसीबी (NCB) प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या शक्यतेबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल (Nana Patole) यांनी मात्र सडेतोड भाष्य केले आहे. नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, 'मी तुम्हाला सांगतो. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.'
पाठिमागील काही काळापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जातो आहे. यात आता नवे काहीच राहिले नाही. या आधीही एनसीबीने केलेल्या अनेक कारवाया फोल ठरल्या आहेत. त्यामुळे त्यात आता आर्यन खान प्रकरणाची भर पडली. आर्यन खान प्रकरणावर काँग्रेसने त्याहीवेळी भूमिका स्पष्ट मांडली होती. ही कारवाई म्हणजे पूर्वरचित एक प्रकरणच होते. वानखेडे हा केवळ या प्रकरणातील एक पोपट होता. वानखेडे यांनी केलेल्या कारवाया कशाही असल्या तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे मी तुम्हाला सांगतो, असे पटोले यांनी म्हटले. (हेही वाचा, Drugs on Cruise Case: Aryan Khan प्रकरणाचा तपास करणारे NCB अधिकारी Sameer Wankhede यांच्यावर केंद्राकडून कारवाईची शक्यता)
आर्यन खान याच्या फोनमध्ये असलेले व्हॉट्सअॅप चॅट वगळता त्याच्याकडे काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही. याशिवाय या प्रकरणात सहआरोपी असलेल्या मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंय यांचाही या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले.त्यांच्याकडे गुन्हा करण्याचा कट रचल्याचा पुरावाही आढळून आला नाही असे नमूद करत सर्वोच्च न्यायालयानेही या तिघांना जामीन मंजूर केला होता. दरम्यान, या प्रकरणाचा तपास मुंबई एनसीबीकडून काढून घेत तो दिल्ली एसआयटीकडे दिला होता.