Nagpur: शाळेत येण्यासाठी उशिर झाल्याने शिक्षकांकडून मुलीला शिक्षा, छड्यांचा मार आणि उठाबशा काढायला लावल्याने प्रकृती खालावली
Image Used For Representation (Photo Credits: Facebook)

Nagpur:  कोरोना व्हायरसमुळे गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ शाळा अद्याप सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे मुलांना घरुनच ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. परंतु ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणासाठी काही अडचणी सुद्धा येत असल्याचे समोर आले आहे. याच पार्श्वभुमीवर नागपूर येथील एका विद्यार्थिनीला शिक्षकांनी शाळेला उशिर झाला म्हणून मोठी शिक्षा दिल्याची बाब समोर आली आहे. या शिक्षेमुळे मुलीची प्रकृती सुद्धा खालावली गेल्याचे सांगण्यात आले आहे.(Mumbai: धक्कादायक! तीन महिन्यात दोन वेळा Covid-19 चा संसर्ग; नैराश्येमधून जोडप्याने केली आत्महत्या, 10 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न)

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चौथी मध्ये शिकणाऱ्या एका मुलीला शाळेत येण्यासाठी विलंब झाला. यामुळे मुलीला शिक्षिकेने हातावर छड्यांचा मार आणि 200 उठाबशा काढण्यास सांगितल्या. या प्रकारामुळे मुलीची तब्येत बिघडली गेली आहे. शिक्षा देणाऱ्या शिक्षिकेच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. तर ग्रामीण भागातील मुलांना शिकवण्यासाठी तरुण-तरुणींची शिक्षकमित्र म्हणून निवड करण्यात आली आहे. याच शिक्षकमित्र मधील एका तरुणीने या चौथी मध्ये शिकणाऱ्या मुलीला शिक्षा दिली आहे.(Worli Lift Collapsed: ओव्हरलोडिंगमुळे लिफ्ट कोसळली; बचावकार्य सुरु- आदित्य ठाकरे)

या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकमित्र तरुणीसह वर्गशिक्षेकेच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केलेली पण या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. तसेच मुलीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मानसिक त्रास सुद्धा मुलीला झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.