नागपूर: प्रेयसीला भुरळ पाडण्यासाठी अल्पवयीन प्रियकराची अनोखी शक्कल, युट्युबवर व्हिडिओ पाहून चोरली रेसिंग बाईक
प्रतिकात्मक फोटो | Photo Credits: You Tube)

प्रेमवीर त्यांच्या प्रेयसीला खुश करण्यासाठी काय पराक्रम करतील याचा विचारच करायला नको. एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याची शपथ घेण्यापासूनच त्यांच्या नात्याला सुरुवात होत मी तुला नेहमीच आनंदित ठेवीन अशी स्वप्ने तिला दाखवली जातात. पण नागपूरात तर एका अल्पवयीन प्रियकराने प्रेयसीला भुरळ पाडण्यासाठी चक्क रेसिंग बाईकची चोरी केली. चोरी केली बाईक परंतु ती कशी चोरायची याचा व्हिडिओ प्रियकराने चक्क युट्युबवर पाहिला होता. या प्रकरणी सदर अल्पवयीन आरोपी प्रियकराला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

आरोपी याने चोरी करण्यासाठी एक नव्हे तर तीन बाईक चोरल्याची बाब समोर आली आहे. तर चोरलेल्या बाईक या अत्यंत महागड्या आणि रेसिंगच्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रेयसीसाठी काय पण असे त्या आरोपी प्रियकराचे म्हणणे आहे.आरोपीने त्याने कशा पद्धतीने बाईकची चोरी याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. आरोपीने पोलिसांना अधिक स्पष्टीकरण देत असे म्हटले आहे की, गेल्या 3 महिन्यात 3 रेसिंग बाईक चोरल्या आहेत.(ठाणे: प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने 21 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या)

प्रेयसीला फिरवण्यासाठी तो बाईकची चोरी करत असे. तसेच प्रेयसीला एका बाईकवरुन फिरवण्याची हौस संपली की ती चोरलेली बाईक बेवारस ठिकाणी नेऊन सोडायचा. तर युट्युबवर त्याने रेसिंगच्या बाईकच्या हॅडलचे लॉक कसे तोडायचे याचा अभ्यास केला आणि त्याप्रमाणे त्याने चोरी केली. आरोपी प्रियकरावर आता पर्यंत 14 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.