Nagpur Crime: नागपूरात फोटोग्राफरची भरदिवसा घरात घुसून गोळ्या झाडून हत्या

दरम्यान त्यांच्या घरात घुसून काहींनी गोळ्या झाडून त्यांची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Gun Shot | Pixabay.com

नागपुरात एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना घडली आहे. गोळीबाराच्या घटनेने नागपूर हादरून गेलं आहे. नागपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नागपुरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत राजनगर या भागात ही घटना घडली आहे. घरात घुसून काहींनी गोळ्या झाडल्या आहेत. दरम्यान या घटनेने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध शहरात गोळीबाराच्या घटना या घडल्या आहेत. यामुळे गुन्हेगारांना कायद्याते वचक राहिले आहे की नाही असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.  (हेही वाचा - Woman Kidnapped TV Anchor: व्यावसायिक महिला पडली टीव्ही अँकरच्या प्रेमात; लग्नाला नकार दिल्याने केलं अपहरण, काय आहे प्रकरण?वाचा)

मृत पूनेकर यांना प्रेस फोटोग्राफर म्हणून काम सोडून अनेक वर्षे झाले आहेत. दरम्यान त्यांच्या घरात घुसून काहींनी गोळ्या झाडून त्यांची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विनय पूनेकर हे घरी एकटे असताना एक व्यक्ती आला आणि सायलेन्सर लावलेल्याने पिस्टलने त्यांच्यावर गोळी झाडून पळून गेला.

दरम्यान मागिल काही दिवसांपासून राज्यातील गोळीबाराच्या घटनेंमुळे दहशतीचे वातावरण पहायला मिळत आहे. राज्यात काही दिवसापुर्वी भाजप आमदार गायकवाड यांनी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटातील नेत्यावर गोळीबार केला होता. यानंतर ठाकरे गटातील नेते अभिषेक घोसाळकर यांची देखील गोळी मारून हत्या करण्यात आली होती.