नागपूरः चारित्र्याच्या संशयावरून लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहणाऱ्या जोडीदार महिलेचा खून
Representational Image (Photo Credits: Facebook)

चारित्र्याच्या संशयावरून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live In Relationship) राहणाऱ्या जोरदार महिलेचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना नागपूर (Nagpur) येथील परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे अगोदरच लग्न झाले असून तो एका विवाहित महिलेसोबत गेल्या तीन महिन्यांपासून राहत होता. सिद्धार्थने तिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. या वादातून संतापलेल्या आरोपीने बत्त्याने डोके ठेचून महिलेचा खून केला आणि तेथून पसार झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सिद्धार्थ सोनपिंपळे (35) असे संशयित आरोपीचे नाव आहे. सिद्धार्थ हा औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत किरकोळ कामे करायचा. सिद्धार्थचे पहिले लग्न झाले असून त्याची पत्नी मुलांसह वेगळी राहत आहे. सिद्धार्थची गेल्या 3 महिन्यांपूर्वी एका विवाहित महिलेशी ओळख झाली. संबंधित महिलाही आपल्या पतीला सोडून सिद्धार्थसोबत राहत होती. मात्र, सिद्धार्थ हा मृत महिलेवर संशय करत असून या दोघांत याविषयावरुन सतत वाद होत असे. याच वादातून सिद्धार्थने बत्त्याने डोके ठेचून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा खून केला आणि तेथून पसार झाला. पोलिसांना यांची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्वरीत तपासाची सूत्रे फिरवत पोलिसांनी सिद्धार्थला अटक केली. हे देखील वाचा- अलिबाग कडून मुंबई ला जाणारी बस ट्रकला धडकल्याने 24 जण जखमी; वाचा संपूर्ण माहिती

नुकतीच नॅशनल क्राईम ब्युरोने महाराष्ट्रात घडत असलेल्या गुन्ह्याची आकडेवारी सर्वांसमोर ठेवली होती. यातच नागपूर येथील घटनेने या आकडेवारीत आणखी भर घातली आहे.