Mumbai Serial Blasts Case: मुंबईमधील 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी कोल्हापूरमधील जेलमध्ये होता. जेलमध्येच पाच जणांनी मिळून आरोपीची निर्घृण हत्या केली आहे. या बॉम्बस्फोटात अनेक निष्पाप लोक मृत्यूमुखी पडले. या बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भंवरलाल गुप्ता याचं डोकं फोडून हत्या केली आहे. (हेही वाचा- पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात शिवानी आणि विशाल अग्रवाल दोघांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी)
मिळालेल्या माहितीनुसार, 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मोहम्मद अली खान कोल्हापूरच्या जेलमध्ये जम्नठेपाची शिक्षा भोगत होता. रविवारी जेलमध्ये मोहम्मद अली खान याचं बाथरुम परिसरात अंघोळ करण्यावरून काही कैद्यांसोबत भांडण झालं होते. त्यावेळीस रागाच्या भरात कैद्यांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात आरोपी मोहम्मद अली खान याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जेलमध्ये एकच खळबळ उडाली.
रागाच्या भरात कैद्यांनी ड्रेनेजचे लोखंडी आवरण काढून खानचे डोक्यावर हल्ला केला, त्यानंतर तो जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्याला मृत घोषित करण्यात आले या घटनेनंतर पोलिसांकडून आरोपींच्या सुरक्षतेत वाढ करण्यात आली आहे. प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार आणि सौरभ विकास अशी हल्लेखोरांची नावे आहेत.
मोहम्मद अली हत्ये प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी पाच जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहेत. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेनंतर जेलमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.