Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,346 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची 1,58,756 वर
Medical workers (Photo Credits: IANS)

मुंबई (Mumbai) मध्ये आज कोरोना विषाणूच्या (Coronavirus) 1,346 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 1,58,756 वर पोहोचली आहे. आज शहरामध्ये कोरोनाचे 887 रुग्ण बरे झाले आहेत, यासह आतापर्यंत एकूण 1,25,906 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 24,556 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज शहरामध्ये 42 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 7939 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली.

आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 36 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 28 रुग्ण पुरुष व 14 रुग्ण महिला होत्या. 27 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 15 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. सध्या मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 79 टक्के आहे. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.07 टक्के आहे. 7 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या या 8,43,691 इतक्या आहेत. यासह मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 65 दिवस झाला आहे. (हेही वाचा: कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णसंख्येत पुणे देशात सर्वोच्च; जिल्ह्यात 2 लाखांहून अधिक COVID-19 रुग्ण, Recovery Rate 78 टक्क्यांवर)

पीटीआय ट्वीट -

 

दरम्यान, मुंबईच्या धारावीत आज कोरोनाच्या आणखी 6 रुग्णांची नोंद झाल्याने, इथला आकडा 2830 वर पोहचला. यासह आज महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरस संक्रमित 20,131 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर कोरोना संक्रमित असलेल्या परंतू, उपचार घेऊन बरे वाटू लागल्याने 13,234 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आला. राज्यात आज दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमित 380 जणांचा मृत्यू झाला. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 9,43,772 झाली असून, त्यात 6,72,556 बरे झालेले रुग्ण आणि 27,407 मृत्यूंचा समावेश आहे. सध्या राज्यात 2,43,446 सक्रीय प्रकरणे आहेत.