Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,350 रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,40,882 वर
Coronavirus (Photo Credits: PTI)

गेल्या काही दिवसांपासून मुंबई (Mumbai) मधील कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांची संख्या 1 हजाराच्या आसपास होती, मात्र आज त्यामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1,350 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह शहरामधील संक्रमितांची एकूण संख्या 1,40,882 झाली आहे. मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 834 रुग्ण बरे झाले आहेत व आजवर बरे झालेले एकूण रुग्ण 1,13,577 इतके आहेत. सध्या शहरामध्ये एकूण 19,460 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज मुंबईमध्ये कोरोनाच्या 30 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 7,532 रुग्ण दगावले आहेत. बीएमसीने याबाबत माहिती दिली.

आज मृत्यू पावलेल्या रुग्णांपैकी 27 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 19 रुग्ण पुरुष व 9 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 1 जणांचे वय 40 वर्षा खाली होते. 21, जणांचे वय 60 वर्षा वर होते. तर उर्वरित 8 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. सध्या मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 81 टक्के आहे. 20 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.81 टक्के आहे. 26 ऑगस्ट 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 7,34,619 इतक्या आहेत व मुंबईमधील रुग्ण दुप्पटीचा दर ८६ दिवस आहे.

पीटीआय ट्वीट -

दरम्यान, आज महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 14,718 रुग्ण आढळून आले असून, 355 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील कोविड-19 चा आकडा 7,33,568 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात सध्या 5,31,563 रुग्ण बरे झाले असून, एकूण 23,444 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यामध्ये 1,78,234 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.